ऍमेझॉन प्राइम/नेटफ्लिक्स वरील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपण ऑनलाइन अनेक चित्रपट बघू शकता. पण नक्की कोणता चित्रपट चांगला कोणता बघावा हे ठरवण्यातच आपला खूप वेळ निघून जातो. म्हणूनच आम्ही इथे तुम्हाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांची यादी देत आहोत जे तुम्ही ऍमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स वर फ्री मध्ये बघू शकता.
अशी ही बनवा बनवी (1988)
जर सर्वोत्कृष्ट चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाशिवाय लिस्ट पूर्ण होऊच शकत नाही, मराठी चित्रपट सृष्टीला अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे अशी हि बनवा बनवी.
२३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने मराठी रसिकांच्या मनावर चांगलेच अधिराज्य गाजवले. त्यामुळे आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच ओढीने पाहतात.
अभिनेता अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगावकर, प्रिया अरुण-बेर्डे, निवेदिता जोशी-सराफ, नयनतारा आणि विजू खोटे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
श्वास (२००४)
या यादीतील पुढचा चित्रपट म्हणजे श्वास. हा एक ड्रामा सिनेमा आहे, ज्याचं दिग्दर्शन संदीप सावंत यांनी केलं होतं. चित्रपट खूप भावुक आहे आणि पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमात अरुण नलावडे, अश्विन चितळे, संदीप कुलकर्णी, आणि अमृता सुभाष यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कॅन्सरसारख्या जिंकू न शकणाऱ्या परिस्थितीत एका वृद्धाने आपल्या नातवाला जीवनाचे अमूल्यत्व आणि सौंदर्य कसे दाखवण्याचा प्रयत्न केला, याची ही कथा आहे. हा चित्रपट aजीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याबद्दल आहे.
शाळा
शाळा हा २०११ साली प्रदर्शित झालेला एक मराठी रोमँटिक चित्रपट असून यात अंशुमन जोशी, केतकी माटेगावकर, जितेंद्र जोशी आणि संतोष जुवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा शाळा नावाच्या कादंबरी वरऊन घेतली आहे ज्यात शाळेच्या एका वर्गातील एका मुलीच्या प्रेमात पडलेल्या १४ वर्षांच्या मुलाची कथा दाखविली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.
नटसम्राट
ऍमेझॉन प्राइम/नेटफ्लिक्स व्हिडिओवरील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘नटसम्राट’. चित्रपटाची कथा एका सेवानिवृत्त थिएटर अभिनेत्याभोवती फिरते ज्याची मुले त्याला आणि त्याच्या पत्नीला बेघर करतात.
या वृद्ध दाम्पत्याचा प्रवास हृदय पिळवटून टाकणारा असला तरी अगदी खराखुरा आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, विक्रम गोखले, मेधा मांजरेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हाफ तिकीट (२०१५)
‘काका मुट्टाई’ या पुरस्कारप्राप्त तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक असलेला ‘हाफ तिकीट’ ही एक गोड, भावनिक कथा आहे, जी वंचितांना अविस्मरणीयपणे अनुकूल असलेल्या जगात टिकून राहण्यासाठी वंचितांच्या रोजच्या संघर्षावर प्रकाश टाकते.
समित कक्कड यांच्या समर्थ दिग्दर्शनाखाली हाफ तिकीट हा उत्कृष्ट चित्रपट आहे, जो संजय मेमाणे यांच्या कॅमेरावर्कने आणखी उंचावला आहे. प्रियांका बोस (ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारणारी) यांच्यासह शुभम मोरे आणि विनायक पोतदार या दोन बाल कलाकारांचा दमदार अभिनय तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल.
अगं बाई अरेच्या! (२००४)
स्त्रियांच्या मानसशास्त्राच्या (स्त्रिया काय विचार करतात) या अनेकदा दुर्लक्षित केलेल्या विषयावर या चित्रपटात मजेशीर भाष्य करण्यात आले आहे.
हॉलिवूडपटातून या चित्रपटाचं कथानक घेतला असला तरी दिग्दर्शकाने या विषयाला संपूर्ण देसी (महाराष्ट्रीयन) अँगल दिला आहे. संजय नार्वेकरच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट तुम्ही एकदा जरूर पाहायला हवा.
मुंबई पुणे मुंबई (२०१०)
या यादीतील पुढचा ड्रामा, रोमान्स सिनेमा म्हणजे मुंबई पुणे मुंबई. मुंबईतली एक मुलगी जी आपल्या भावी नवरदेवाला भेटायला पुण्याला येते, ती पूर्ण अनोळखी व्यक्तीबरोबर, त्याला नाकारण्याच्या कल्पनेने दिवस काढते. परंतु चित्रपटाच्या शेवटी तिला जे जाणवते ते पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा.
सैराट
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या पदार्पणात अभिनीत हा चित्रपट वेगवेगळ्या जातींमधील एका मच्छिमाराचा मुलगा आणि एका स्थानिक राजकारण्याच्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या दोन तरुण विद्यार्थ्यांची कहाणी आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात संघर्ष निर्माण होतो.