डोहाळे जेवण संपूर्ण माहिती | Dohale Jevan information in Marathi

डोहाळे जेवण म्हणजे काय  – Baby Shower Marathi

Dohale Jevan – डोहाळे जेवणाच्या शुभेछया द्यायला आपण अनेक कार्यक्रमांना गेला असाल पण डोहाळे जेवण म्हणजे नक्की काय हा प्रश्न आपल्याला अनेकदा पडला असेल.

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील गर्भवस्थेचे क्षण हे महत्वाचे असतात त्यापैकी एक आनंदी कार्यक्रम म्हणजे डोहाळे जेवण याला इंग्रजी मध्ये baby shower असेही म्हणतात.

प्रेम, आशीर्वाद आणि मातृत्वाची तयारी करण्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि मित्र या कार्यक्रमासाठी एकत्र येतात. एक झुला बनवला जातो आणि फुलांनी सजवला जातो. स्त्री होण्यासाठी आई झुल्यावर बसते आणि आशीर्वाद स्वीकारते. 

डोहाळे लागणे म्हणजे काय

आपल्या घरात बाळ जन्माला येणे हि मोठी भाग्याची मोठी गोष्ट आहे, बाळ म्हणजे जणू कुलदीपक त्याचे स्वागत करायचे म्हणजे हि अभिमानाची गोष्ट. चौथ्या महिन्यात गर्भस्थ बालकाच्या हृदयात प्रवेश होतो व त्याची स्पंदने जाणवू लागतात म्हणून गर्भिणी स्त्री ला दोहद म्हटले जाते.

गर्भवती स्त्रीला डोहाळे लागतात म्हणजे नक्की काय होते, गर्भस्थ बालकाच्या हृदयातील सुप्त इच्छा हा डोहाळ्याच्या रूपाने जाणवू लागतात म्हणून गर्भवती स्त्रीस डोहाळे लागले असे म्हटले जाते. गर्भवतीला तिच्या आवडी निवडीचे पदार्थ खाऊ घालणे तिच्या हौशी पुरवणे म्हणजेच डोहाळे जेवण. 

डोहाळे जेवणाच्या निमित्ताने सर्व कुटुंबियांकडून आणि मित्र परिवाराकडून गोड कौतूक करण्यात येत. या समारंभासाठी बरेच प्लॅनींग केले जाते, आजकाल बरेच जण डोहाळे जेवण अगदी थाटामाटात साजरे करतात तर काही जण अगदी सध्या पद्धतीने किंवा घरगुती समारंभ करतात.

डोहाळे जेवण/ ओटी भरणाचे प्रकार 

Baby Shower Meaning in Marathi  – ओटी भरण्याचा मूळ उद्देश गर्भावर उत्कृष्ट प्रकारचे बौद्धिक आणि शारीरिक सुसंस्कार होणे हा आहे. हा सोहळा प्रत्येकाच्या परंपरेनुसार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जातो. त्याचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
नावेतील ओटीभरण

बागेतील ओटीभरण
झोपला वरील ओटीभरण
धनुष्यबाणाचे ओटीभरण
हरीच्या आखरातील ओटीभरण
मंदिरातील ओटीभरण0
चांदण्यात ओटीभरण  

डोहाळे जेवणाचा विधी कधी करावा

काही ठिकाणी हा कार्यक्रम सकाळी किंवा काही ठिकाणी हा कार्यक्रम आपल्या सोयीनुसार संध्याकाळी केला जातो. यासाठी कोणताही मुहूर्त काढण्याची गरज नाही परंतु ७वा महिना संपण्या आधी हा कार्यक्रम करावा.

मित्रानो डोहाळे जेवणाचा लग्न अथवा मुंजीप्रमाणे मुहूर्त काढावा लागत नाही मात्र ७ वा महिना लागल्यापासून ते ८व्या महिन्यापर्यंत तुम्ही एक चांगला दिवस पाहून डोहाळे जेवणाचा कार्क्रम करू शकता.

तसेच या कार्यक्रमासाठी काही विशिष्ट विधींची गरज नसते त्यामुळे या कार्यक्रमाला भटजींची आवश्यकता नसते. घरच्या महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला जातो.

डोहाळे जेवण कसे करावे – Dohale Jevan Vidhi in Marathi

साधारणतः ७व्या महिण्यात बाळाची वाढ पूर्ण झालेली असते, आणि त्यावेळी बाळाला अधिक अन्न लागते आणि त्यासाठीच डोहाळे जेवण आयोजित केले जाते आणि बाळाचे चोचले अर्थात महिलेचे डोहाळे यावेळी पुरवले जातात.

यातील दुसरा भाग मध्ये पहिले तीन महिने झाले कि चोर ओटी भरण्यात येते, आणि त्यांनतर ७व्या महिन्यात परंपरा आणि रितीनुसार ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो यालाच ओटी भरणे सुद्धा म्हणतात.

या कार्यक्रमात दोन वाट्यांमध्ये बर्फी आणि पेढा लपवण्यात येतो नंतर ना पाहता गर्भवती महिने एक वाटी निवडायची असते. पूर्वपरंपरागत चालत आलेल्या या खेळात खूप मज्जा येते. बर्फी आल्यास मुलगी होणार व पेढा आल्यास मुलगा होणार असा अंदाज बांधला जातो.

ओटी भरणं सामान लिस्ट/ डोहाळे जेवण साहित्य

खाली मी तुम्हाला डोहाळे जेवणासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट (Oti Bharan Sahitya) दिली आहे, जेणेंकरून तुमची ऐन समारंभाच्या वेळेला गडबड होणार नाही.

 • ५ फळ
 • हिरवी साडी
 • हिरव्या रंगाचे ब्लॉऊस पीस
 • फुलांचा गजरा
 • तांदूळ
 • नारळ
 • सुपारी
 • हळकुंड
 • खारीक
 • बदाम
 • हळकुंड
 • गर्भवती महिलेचं आवडते गिफ्ट्स 

डोहाळे जेवण उखाणे / Baby Shower Ukhane in Marathi

 • रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा
  …… ना अन् मला येणारया बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा.
 • कुबेराच्या भांडारात हिरे-माणिकांच्या राशी, ….. रावांनी आणला शालू डोहाळे जेवणाच्या दिवशी.
 • चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ, …..चे नाव घेते केला डोहाळ जेवणाचा थाट
 • Coffee
 • मावळला सूर्य, उगवला शशी, …..चे नाव घेते डोहाळ जेवणाच्या दिवशी
 • सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौशी, ……चे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी
 • हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस, ……चे नाव घेते सासरच्यांनी केली हौस
 • तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले, ……चे नाव गोड, पुरवा माझे डोहाळे
 • बाळराजांची चाहुल दरवळला परिसर, ….. च्या सहवासात माझे जीवन होईल सफल

तर मित्रानो हि होती डोहाळे जेवणाबद्दलची संपूर्ण माहिती, तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा. 

हे सुद्धा वाचा,

मखाना खाण्याचे १० अविश्वसनीय फायदे

मोरिंगा खाण्याचे १७ फायदे

जाणून घ्या संपूर्ण घराचे वास्तू शास्त्र

ध्यान म्हणजे काय? ध्यानाचे फायदे, ध्यान कसे करावे संपूर्ण माहिती?

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *