वित्त नियोजन हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. आजच्या जगात सर्व वयोगटातील लोकांसाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे.
आपल्या सर्वांना माहित आहे की, जसे जगण्यासाठी अन्नाची गरज असते, तसेच पैशाचीही गरज असते. जर आपल्याकडे पैसे आहेत तर ते चांगल्या प्रकारे खर्च करणे आणि योग्य गुंतवणूक करणेदेखील आवश्यक आहे.
खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतच असतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पैशाचे योग्य नियोजन आधीच ठेवले तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
आर्थिक नियोजन सुरू करण्यापूर्वी स्थिर उत्पन्न निश्चित करणे महत्वाचे आहे जेणेकरून आपण त्यानुसार नियोजन करू शकता.
प्रथमत: आपल्याला आपले उत्पन्न मुख्य दोन भागांमध्ये विभागावे लागेल:
मूलभूत गरज (मासिक गरज, छंद आणि मनोरंजन)- 70%
गुंतवणूक -30% (किमान)
आपले ३०% उत्पन्न आपण कुठे गुंतवू शकता याबद्दल काही महत्वाचे पॉईंट्स :
१.प्रथम जर आपली कमाई फारशी नसेल तर म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीसारख्या छोट्या गुंतवणूकीपासून सुरुवात करा.
अनुभवी व्यक्ती किंवा फर्मच्या मदतीने इक्विटीमध्ये गुंतवणूक करा व पगार वाढल्यानंतर त्यातली गुंतवणूक आपण वाढवू शकता.
२. दुसरी गोष्ट म्हणजे आपले आरोग्य ज्याची आपण काळजी घेतली पाहिजे .आजकाल बाजारात 5 लाख रुपयांचा आरोग्य संरक्षण विमा आपल्याला 4-5 हजारांमध्ये सहज उपलब्ध होईल..
३.लग्नानंतर टर्म लाइफ इन्शुरन्स असणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरून तुमच्या वर depend असणारयांचे (पत्नी/पती आणि मुलाचे) भविष्यदेखील सुरक्षित होईल.
एक चांगला ऑनलाइन टर्म विमा खरेदी करा. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या कारकीर्दीत शक्य तितक्या लवकर तुम्ही हि गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून तुम्ही कमी प्रीमियम आणि अधिकचा कव्हरेजचा लाभ घेऊ शकाल.
जर तुम्ही धूम्रपान करत नसाल तर ३० वर्षे कालावधीसाठी सुमारे ५० लाख रुपयांचे ऑनलाइन कव्हर आपल्याला फक्त ५००० रुपये वार्षिक दराने उपलब्ध होईल.
४.चांगल्या stocks मध्ये दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करा जेणेकरून आपल्याला लाभांश आणि बोनस शेअर्स चा फायदा मिळू शकेल.
५.साधे आयुष्य जगा आलिशान जीवनाच्या मायाजालात पडू नका. नवनवीन वस्तू खरेदी करण्यात आपले पैसे वाया घालवू नका.
मूलभूत गरज जसे एक कार, एक फोन हे चालू शकेल, परंतु प्रयत्न करा के या वस्तू शक्य होईल तितक्या जास्त दिवस वापरल्या जातील. कारण या depreciating गोष्टी आहेत व या वस्तूंचा आपल्याला काहीही रिटर्न्स भेटत नाही.
६.किंमती कमी झाल्या असल्यास आपण सोन्यात देखील गुंतवणूक करू शकता. जेव्हा सोने किंवा चांदीची किंमत कमी असेल तेव्हा ते खरेदी करणे कधीही चांगला सौदा ठरू शकतो.
७.सेवानिवृत्तीचे नियोजनदेखील महत्वाचे आहे त्याकरिता पीपीएफ मध्ये गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे.
८.कर्ज काढून कोणत्याही वस्तू खरेदी करू नका, व्याज भरून दुप्पट देण्याऐवजी रोख रक्कम देऊन वस्तू खरेदी करणे कधीही चांगले.
९.नवीन कौशल्ये शिकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण आपले उत्पनाचे स्रोत वाढवू शकाल.
१०.उत्पन्नाचे इतर अधिक स्रोत शोधण्याचा प्रयत्न करा.
११.काही गुंतवणूक छोट्यास्या कालावधीसाठी असुद्या जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला ते पैसे सहज मिळू शकतील.
१२.जर आपल्याकडे अधिकचे उत्पन्न असेल तर रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक हा देखील योग्य सुलभ पर्याय आहे. हि गुंतवणूक आपल्याला येत्या काही वर्षात दुप्पट उत्पन्न देईल.
आशा आहे की वर दिलेले गुंतवणूक सल्ले तुम्हाला तुमच्या आर्थिक नियोजना मध्ये मदत करतील!!
All the best
हॅपी इन्व्हेस्टिंग!!
इतर महत्वाचे लेख,
तरुण वयात तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी १२ स्मार्ट टिप्स
Bank Overdraft: तुम्हाला अचानक पैशांची गरज भासणार नाही, बँकांची ही सुविधा उपयुक्त आहे
इक्विटी म्हणजे काय? (तपशीलवार जाणून घ्या) | इक्विटीचा मराठीत अर्थ
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी: रणनीती, टिप्स, धोके (संपूर्ण माहिती)