आरोग्य माहितीपूर्ण

Flax Seeds Benefits in Marathi | जवस खाण्याचे गुणकारी फायदे

flax seeds in marathi

Flax Seeds , Alsi Seeds in Marathi – आपण दररोज घरी Flax Seed म्हणजेच जवस चा वापर करत असालच, घरात बनवलेल्या अनेक पदार्थांमध्ये जवस चा वापर केला जातो.

वास्तविक जवस ची बीजे खूप लहान असली तरी त्यांच्यात इतके आरोग्यदायी गुणधर्म आहेत के ज्याचा अंदाज तुम्ही कधीच लावू शकत नाही.

जवस चा खूप काळा आधी पासून कापड तयार करण्यासाठी वापर केला जात आहे . आजच्या काळात जवस ला nutrition चा भांडार म्हटलं जात जे healthy omega-३, fatty acids आणि फायबर चा उत्तम स्रोत आहे.

आपण सर्व जण केवळ अन्न म्हणून वापरत असलेल्या फ्लॅक्स सीडमुळे अनेक आजार हि बरे होऊ शकतात याची आपल्याला कल्पनाही नसेल? होय, जवस चे इतर अनेक गुणकारी फायदे आहेत.

तुम्ही जवस चा वापर करून अनेक आजारांना दूर पळवू शकता व तुमच्या कुटुंबाला निरोगी बनवू शकता.

या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला जवस चे फायदे (Javas in marathi), आणि त्याचे गुणधर्म सांगितले आहेत. जर तुम्हाला ते माहीत नसतील, तर हा लेख नक्कीच वाचा आणि जवस चे फायदे (Alsi Seeds Benefits in Marathi) जाणून घ्या – 

फ्लॅक्स सीड/अलसी म्हणजे काय? (What is Flax Seeds in Marathi) :

फ्लॅक्स सीड हे फ्लॅक्स प्लांट पासून बनते (ज्याला Linum usitatissimum म्हणूनही ओळखले जाते),  याचे झाड सुमारे २ फूट उंच वाढते. जवस चे झाड प्रथमतः इजिप्तमध्ये आढळले गेले होते परंतु आता जगभरात त्याची लागवड केली जाते.

अन्य भाषांमध्ये जवस ची नावे (Flax Seeds Name) :

Flax seeds in Hindi or Linseed in Hindi – तीसी, अलसी
Flax seeds in Hindi or Linseed Urdu – अलसी (Alasi)
Alsi in English – लिनसीड (Linseed), फ्लैक्स प्लान्ट (Flax plant), कॉमन फ्लैक्स (Common flax)
Flax seeds in Hindi or Linseed Sanskrit – अतसी, नीलपुष्पी, नीलपुष्पिका, उमा, क्षुमा, मसरीना, पार्वती, क्षौमी
Flax seeds in Hindi or Linseed Oriya – पेसू (Pesu)
Flax seeds in Hindi or Linseed Uttarakhand – अलसी (Alsi)
Flax seeds or Alsi in Kannada – अगसीबीज (Agasebeej) सेमीअगासे (Semeagase), अलसी (Alashi)
Flax seeds in Hindi or Linseed Konkani – सोन्नबीअम (Sonnbiam)
Alsi in Gujarati – अलसी (Alshi)
Flax seeds or Alsi in Tamil – अलिविराई (Alivirai), अलसीविराई (Alshivirai)
Flax seeds or Alsi in Telugu – अविसि (Avisi), उल्लुसुलू (Ullusulu), मदनजिन्जालु (Madanginjalu);
Flax seeds or Alsi in Bengali – तिसी (Tisi), मसीना (Masina), असिना (Asina)
Alsi in Punjabi – अलीश (Alish), अलसी (Alasi), अलसी (Atashi)
Flax Seeds in Marathi Name– जवस (Javas), अलशी (Alashi)
Flax seeds or Alsi in Malayalam – अगासी (Agashi), चार्म (Charm), चेरुकाना (Cherucana), अकासी (Akasi)
Flax seeds in Hindi or Linseed Nepali – अलसी (Alasi)
Flax seeds in Hindi or Linseed Arabic – केट्टन (Kettan), बाजरुलकटन (Bazrulkattan)
Flax seeds in Hindi or Linseed Persian – तुख्म-ए-कटन (Tukhm-e-kattan)

हे सुद्धा वाचा – प्लेटलेट्स काय आहेत, कारणे, लक्षणे, उपाय व प्रतिबंध

फ्लॅक्स सीडची पोषण वस्तुस्थिती काय आहे? कॅलरी, कार्ब्स, फायबर आणि बरेच काही :

 • ८० कॅलरी
 • 3 ग्रॅम प्रथिने 
 • ४ ग्राम कार्बोहायड्रेट
 • ६ ग्राम फॅट. फ्लॅक्स सीड ओमेगा-3 फॅटी ऍसिड, अल्फा-लिनोलेनिकआम्ल (निश) च्या सर्वोत्कृष्ट स्त्रोतांपैकी एक आहे.
 • ४ ग्राम फायबर
 • 100 मिलीग्राम फॉस्फरस
 • 60 मिली ग्रॅम मॅग्नेशियम
 • 120 मिली ग्रॅम पोटॅशियम 

फ्लॅक्स सीड विरुद्ध चिया सीड्स :

चिया बियाणे हे देखील जवस सारखे Nutrition च्या बाबतीत प्रसिद्ध असणारे बियाणे आहे.
पण आरोग्याच्या बाबतीत कोणत बियाणे अधिक चांगले आहे? चला बघूया

 • प्रथिने आणि पोटॅशियमची पातळी दोन्ही बियांमध्ये अगदी समान असते.
 • चिया बियाण्यांमध्ये फ्लॅक्स सीड पेक्षा थोड्या कमी कॅलरीस असतात.
 • चिया बियांमध्ये फ्लॅक्स सीड पेक्षा थोडे जास्त कार्बोहायड्रेट, कॅल्शियम आणि फायबर असते.
 • फ्लॅक्ससीडमध्ये अधिक ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतात.

कदाचित चिया बियाण्या मध्ये असणाऱ्या उच्च फायबर च्या गुणधर्मा मुळे ते फ्लॅक्स सीड्स पेक्षा अधिक गुणकारी आहेत.

जवस/अळशी खाण्याचे फायदे (Flax Seeds Benefits in Marathi)

हृदय रोगापासून वाचवतात

हे लहान तपकिरी-काळे बियाणे आपल्याला हृदय रोगापासून वाचवतात. त्यात असलेले विरघळणारे तंतू नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करतात. यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा होणारे कोलेस्टेरॉल कमी होते आणि रक्तप्रवाह सुधारतो, परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका संभवत नाही.

निद्रानाशात वापर

निद्रानाशात जवस चे सेवन फायदेशीर आहे. त्यासाठी जवस आणि एरंड तेल समान प्रमाणात तांब्याच्या प्लेट मध्ये चांगले दळून घ्यावे.
आणि हे मिश्रण डोळ्यांमध्ये काजळासारखे लावल्याने चांगली झोप मिळण्यास मदत होते.

रक्तप्रवाह सुधारतात

जवस ओमेगा-३ ने समृद्ध असतात जे रक्तप्रवाह सुधारतात तसेच रक्त गोठणे किंवा गुठळ्या होण्यापासून रोखतात, जी हृदयविकाराची मुख्य कारण आहे. रक्तात असलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासदेखील हे उपयुक्त आहे.

त्वचा निरोगी आणि चमकदार होते

जवस मध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि फायटो केमिकल्स वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात, सुरकुत्या रोखतात आणि त्वचेवर घट्टपणा राखतात. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते.यात असलेला लाइगन नामक घटक आतड्यांमध्ये सक्रिय होऊन एक असा घटक तयार करतो जो स्त्री हार्मोन्स चा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

कर्करोगाशी लढण्यास मदत करते

जवस मध्ये अल्फा लिनॉइक आम्ल असते, जे सांधेदुखी, दमा, मधुमेह आणि कर्करोगाशी (cancer) लढण्यास मदत करते. आतड्याच्या कर्करोगाशी लढण्यासाठी हे विशेष उपयुक्त आहे.

मर्यादित प्रमाणात जवस (flaxseed) चे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. यामुळे शरीराचे अंतर्गत भाग निरोगी राहतात आणि ते अधिक चांगले काम करतात.

शाकाहारी लोकांसाठी उपयुक्त

जवस तेलाने म्हणजेच Flaxseed Oil ने मालिश केल्याने शरीराचे अवयव स्वस्थ होतात आणि ते अधिक चांगल्या प्रकारे काम करतात.

आतापर्यंत मासे ओमेगा-३ चा एक चांगला स्रोत मानले जात असे परंतु शाकाहारी लोकांसाठी जवस हा ओमेगा-३ चा एक चांगला पर्याय आणि स्रोत आहे

निरोगी राहण्यास मदत होते

दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा जवस सेवन केल्याने आपले शरीर पूर्णपणे निरोगी राहण्यास मदत होते, हे बारीक पावडर करून आणि पाण्या सोबत देखील घेऊ शकतो.

नियमित दिनचर्येत जवस चा समावेश करून, आपण विविध प्रकारच्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता जेणेकरून आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही.  

पुरुषांसाठी फ्लेक्ससीडचे फायदे

 • शरीराचा थकवा आणि पुरुषांची अशक्तपणा दूर करण्यासाठी जवस उपयुक्त आहे.
 • पुरुषांमधील लैंगिक समस्या दूर करण्यासाठी देखील फ्लॅक्स सीड्स उपयुक्त आहे.
 • वंध्यत्वाने त्रस्त असलेल्या पुरुषांसाठी फ्लेक्ससीडचे सेवन करणे फायदेशीर आहे.
 • जवस पुरुष शुक्राणूंची संख्या वाढवते आणि प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते.

रिकाम्या पोटी फ्लेक्स सीड खाण्याचे फायदे

जर तुम्ही रिकाम्या पोटी फ्लॅक्ससीडचे सेवन केले तर तुम्हाला खालील फायदे होतील.

 • फ्लेक्ससीड स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, कोलन कर्करोगाचा धोका कमी करते. यासाठी फ्लॅक्ससीड सकाळी रिकाम्या पोटी घ्या.
 • जर महिलांना मासिक पाळी अनियमित होत नसेल किंवा मासिक पाळीत तीव्र वेदना होत असतील तर रिकाम्या पोटी फ्लेक्ससीड खाणे फायदेशीर ठरते.
 • जवस केसांचे सौंदर्य देखील वाढवते. केस गळणे, कोंड्याची समस्या, टक्कल पडणे यासारख्या समस्या जवस खाल्ल्याने दूर होतात.

जवस खाण्याचे दुष्परिणाम – Side Effect of Flax Seeds in Marathi

जर तुम्ही रिकाम्या पोटी फ्लॅक्ससीडचे सेवन केले तर तुम्हाला खालील फायदे होतील.

 • जर तुम्ही फ्लॅक्ससीडचे जास्त सेवन करत असाल आणि कमी द्रवपदार्थ किंवा कमी पाणी पीत असाल प्याल तर त्यामुळे तुमच्या आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
 • फ्लॅक्ससीड योग्य प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठता बरी होते, तर जास्त प्रमाणात खाल्ल्यास अतिसार होऊ शकतो.
 • जर तुम्हाला गर्भधारणा करायची असेल, तर तुम्ही फ्लेक्ससीडचे सेवन टाळावे.
 • जास्त प्रमाणात जवस खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते. कमी रक्तदाब, श्वास घेण्यात अडचण यासारख्या समस्या उदभवू शकतात.

जवस चे फायदे आणि हानी जाणून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचा वापर करा किंवा फ्लेक्ससीड खा. हे उत्तम आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. याचे नियमित सेवन योग्य प्रमाणात करा.

तर मित्रानो हे होते जवस खाल्ल्याने होणारे फायदे तर आपल्याला हा लेख कसा वाटलं ते आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

हे सुद्धा नक्की वाचा

गोवर हा संसर्ग नेमका काय? गोवरची लक्षणे आणि उपचार

‘शतावरी’ एक जादुई औषधी वनस्पती, शतावरीची संपूर्ण माहिती

दुर्मिळ होत चाललेले Kavat Fruit फळ आहे अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या

Barley Meaning in marathi – फायदे, उपयोग, नुकसान

आश्चर्यकारक सुपरफूड क्विनोआ (Benefits Of Quinoa In Marathi)

Avatar

teamdeeplyquote

About Author

डिपली मराठी - मराठी मध्ये माहिती ! आमचे उद्दीष्ट मराठी ब्लॉगिंगमध्ये मोलाचे योगदान देणे हे आहे. या ब्लॉगवर आपल्याला थोर लोकांचे विचार, महापुरुषांची चरित्रे, आरोग्याशी संबंधित उत्तम माहिती, अभ्यासाशी संबंधित लेख अशी अनेक प्रकारची मनोरंजक माहिती मराठी मध्ये भेटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

हे सुद्धा वाचा

chia seeds meaning in marathi
माहितीपूर्ण

चिया बिया काय आहेत, त्याचे फायदे | Chia Seeds/Sabja Seeds in Marathi

chia seeds in Marathi - चिया बियाणे खूप फायदेशीर आहेत, या लेखा मध्ये तुम्हाला चिआ सीड्स चे 7 जबरदस्त फायदे
Unique house names in Marathi
मराठी ज्ञान माहितीपूर्ण

अनोखी मराठी घरांची नावे | Royal House Names in Marathi

येथे आम्ही अनेक घरांच्या नावाच्या कल्पना (House Names in Marathi) सूचीबद्ध केल्या आहेत

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !