माहितीपूर्ण

किराणा सामानाची यादी कशी करावी,याची संपूर्ण माहिती | Kirana List in Marathi

Kirana saman yadi

महिन्याचा किराणा कसा भरावा आणि साठवावा – Kirana List Marathi

आजच्या या लेखात आपण दर महिन्याचा किराणा कसा भरावा हे समझून घेणार आहोत .

बरेच जण किराणा भरताना काही पदार्थ लिहत नाही त्यामुळे ते परत परत आणावे लागतात किंवा कधी कधी आधीच आपला किराणा थोडा शिल्लक असतो तर तो कधी जास्त भरला जातो किंवा परत आणला जातो.

या लेखात मी तुम्हाला व्यवस्थित किराणा लिस्ट कशी बनवावी हे सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा कोणताच पदार्थ आणायचा राहणार नाही किंवा कोणता पदार्थ जास्त आणला जाणार नाही.

चला तर मग सुरु करूया….

कायमस्वरूपी किराणा लिस्ट (Kirana Saman List)

मराठी किराणा यादी

 

marathi kirana list

 

इथे मी तुम्हाला कायमस्वरूपी किराणा लिस्ट दिली आहे यातील सगळ्याच वस्तू आपण प्रत्येक महिन्याला आणत नाही परंतु कोणतीच गोष्ट विसरू नये म्हणून हि लिस्ट तुम्हाला मी देत आहे.

या लिस्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य, डाळी, कडधान्य, नाष्टाचे पदार्थ, पीठ किंवा इतर अनेक प्रकारचं साहित्य जसे के तेल, मसाले, sauce, मुलांसाठी खाऊ, ड्रायफ्रुटस या सगळ्या गोष्टीचा समावेश केला आहे.

बाजारात जाताना हि लिस्ट डोळ्यासमोर ठेवावी, एकदा किचन मधले सगळे डब्बे चेक करावे, डाळी, कडधान्य किती शिल्लक आहेत आपल्याला महिन्याला किती लागत आणि किती शिल्लक आहे याचा अंदाज घ्यावा.

उदा. तुम्हाला महिन्याला १ kg शेंगदाणे लागतात आणि पाव kg शिल्लक आहेत, तर लिस्ट मध्ये पाव kg शेंगदाण्याचा समावेश करावा.

एकदा फ्रिज हि बघून घ्यावा कारण फ्रिज मधले सामान हि संपलेले असू शकते. त्यानंतर housekeeping च सगळं साहित्य, पर्सनल care साठी लागणारे साहित्य आणि पूजेचं साहित्य बघून घ्यावे.

यासोबत एकदा कॅलेंडर बघून घ्यावे जेणेकरून कोणता सण आहे अथवा कोणी पाहुणे येणार असतील तर जास्तीचे सामान भरावे.

हे सुद्धा वाचा – 1437 चा मराठी मध्ये अर्थ

किराणा व्यवस्थित कसा ठेवावा

किराणा भरल्यानंतर खूप साहित्य डोळ्यासमोर असते जेणेकरून ते बघूनच दडपण येते त्यामुळे तो किराणा २-३ दिवस तसाच पडून राहतो आणि नंतर अचानक आपण तो घाई घाई मध्ये भरून टाकतो.

तर असे न करता किराणा १-२ तासामध्ये व्यवस्थित कसा भरायचा ते आता आपण जाणून घेऊ.

१. किराणा आणल्यानंतर सगळ्या ठोकळ वस्तू म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण काढून किंवा निवडून ठेवत नाही उदा. तेलाच्या बाटली, साबण, टूथपेस्ट इत्यादी त्या बाजूला करून घ्याव्या आणि पटकन जागच्या जागी ठेवाव्या.
या गोष्टी एकदा जागच्या जागी ठेवल्यानंतर अर्धा किराणा कमी होतो व तुम्हला सुटसुटीतपणा वाटू लागेल.
२. त्यानंतर सगळं पूजेचं साहित्य लावून घ्यावे.
३. नंतर उरलेल्या किराण्याच्या २ भाग करावे, एक भाग ज्यामध्ये तुम्हाला सगळं साहित्य निवडून ठेवावे आणि २र भाग अशा वस्तू ज्या तुम्हाला डब्ब्यात काढून ठेवायच्या आहेत पण निवडण्याची गरज नाही आहे. उदा. मुलांचा खाऊ, चहा, साखर.
४. डब्ब्यात वस्तू ठेवताना ज्या नवीन वस्तू आहे त्या खाली ठेवाव्या व जुन्या वस्तू वर ठेवाव्या असे केल्याने तुमचे जुने साहित्य लवकर वापरले जाईल. उदा. जुनी साखर प्रथम एका भांड्यात काढून घ्यावी, त्यानंतर नवीन साखर डब्ब्यात ठेवावी न नंतर जुनी साखर वरून ठेवावी.
५. आता उरलेले साहित्य भरावे जे तुम्हाला चाळून किंवा निवडून ठेवायचे आहे.

किराणा दुकानातील वस्तूंची यादी (Kirana List in Marathi)

आम्ही खाली विविध श्रेणींमध्ये किराणा मालाची यादी तयार केली आहे, जेणेकरून तुम्हाला ती सहज समजेल.

खाली दिलेल्या वस्तूंमध्ये पूजेच्या वस्तू आणि विविध प्रकारच्या वस्तूंची यादी वेगवेगळ्या प्रकारे तयार केली आहे.

याच्या मदतीने तुम्ही सूची बनवून सर्व किराणा सामान ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता.

मसाले

 • हळद पावडर
 • मिरची पावडर
 • जिरे
 • धणे पावडर
 • मेथीचे दाणे
 • बडीशोप
 • कोरडे आले
 • हिंग
 • वेलची
 • मोहरीचे दाणे
 • अजिनोमोटो
 • तमालपत्र
 • काळी मिरी
 • काळे जिरे
 • दालचिनी
 • तीळ
 • जायफळ
 • कढीपत्ता
 • मेथीचे दाणे
 • आमचूर पावडर
 • डाळिंब बिया
 • अंबाडी बिया
 • काळे मीठ
 • केशर
 • पांढरे तीळ
 • चाट मसाला
 • तंदुरी मसाला
 • सांबार मसाला
 • गरम मसाला
 • पावभाजी मसाला
 • बिर्याणी मसाला

डाळीं

 • लाल मसूर
 • मूग डाळ चना डाळ
 • मूग
 • हिरवी मसूर
 • उडीद डाळ
 • साबुदाणा
 • बीन्स
 • कोरडे वाटाणे
 • चणे
 • काळा हरभरा
 • कुलथी डाळ
 • सोयाबीन
 • उडीद डाळ

स्वयंपाकाचे तेल

 • सोयाबीन तेल
 • मोहरीचे तेल
 • सूर्यफूल तेल
 • लोणी
 • तांदूळ कोंडा तेल
 • ऑलिव तेल
 • खोबरेल तेल
 • शेंगदाणा तेल

दुग्धजन्य पदार्थ

 • दूध
 • दही
 • लोणी
 • चीज
 • तूप
 • ताजी मलई
 • चीज ब्लॉक
 • चीजचे तुकडे
 • लोणी

ड्राय फ्रूट

 • मनुका
 • काजू
 • खजूर
 • बदाम
 • पिस्ता
 • फॉक्स नट
 • अक्रोड
 • मनुका
 • खजूर
 • अंजीर
 • जर्दाळू
 • नारळ
 • सुपारी

तांदूळ आणि पीठ

 • बासमती तांदूळ
 • साखर
 • डोस्याचे पीठ
 • इडलीचे पीठ
 • मक्याचं पीठ
 • गव्हाचे पीठ
 • रवा
 • डाळीचे पीठ
 • बाजरीचे पीठ
 • तांदळाचे पीठ
 • मध
 • मीठ

स्नॅक्स

 • मॅगी
 • पास्ता
 • चाउमिन
 • नूडल्स
 • ब्रेड पॅकेट
 • वाळलेले काजू
 • मक्याचे पोहे
 • मुरमुरा
 • बिस्किटे
 • कुरकुरीत पोहे
 • पॉपकॉर्न
 • कॉफी
 • ब्रेड
 • नमकीन/सेव
 • चिप्स
 • फॉक्स नट
 • पास्ता
 • टोस्ट

पूजेचे सामान

 • अगरबत्ती
 • माचिस
 • तेल
 • सूती धागा
 • दिवा
 • कपूर
 • हळद कुंकू
 • कापूस

इतर किराणा सामान

 • दात घासण्याचा ब्रश
 • टूथपेस्ट
 • आंघोळीचा साबण
 • धुण्याचा साबण
 • टॉयलेट क्लिनर
 • टॉयलेट पेपर
 • फिनाइल
 • डिशवॉशर साबण
 • बेकिंग पावडर
 • बेकिंग सोडा
 • टोमॅटो केचप
 • सोया सॉस
 • हॉर्लिक्स / बोर्नविटा
 • कोको पावडर
 • पिझ्झा सॉस
 • शॅम्पू
 • दाढी करण्याची क्रीम
 • दुर्गंधीनाशक
 • हँडवॉश
 • रेझर ब्लेड

Kirana List in Marathi PDF

जर तुम्हाला किराणा स्टोअरच्या वस्तूंची यादी marathi PDF मध्ये डाउनलोड करायची असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

किराणा सामानाची यादी 

वर दिलेले किराणा चे सामान तुम्ही ऑनलाईन amazon वर सुद्धा खरेदी करू शकता

तर मित्रानो आजच्या या लेखात महिन्याच्या किराणा लिस्ट कशी बनवायची आणि आणलेला किराणा खराब न होता कसा ठेवायचा हे जाणून घेतले आहे.

जर तुम्ही सुद्धा हे वर सांगितलेले नियोजन follow केले तर तुमचा हि महिन्याचा किराणा योग्य प्रमाणात आणला जाईल त्यामुळे तुमचा महिन्याचे बजेट कोलमडणार नाही आणि पैशाची बचत होईल.

जर कोणासाठी हा लेख उपयुक्त वाटत असेल तर त्यांना हा लेख नक्की share करा.

हे सुद्धा वाचा –

Amazon वर अधिक सवलत मिळवण्यासाठी 10 Secret Tricks जे अनेकांना माहीतच नाही

७/१२ म्हणजे काय, महत्व, फायदे, 7/12 उतारा ऑनलाईन कसा शोधायचा| (संपूर्ण माहिती)

जवस/अळशी खाण्याचे फायदे

बार्ली चे फायदे, उपयोग, नुकसान (संपूर्ण माहिती)

Avatar

admin

About Author

आमचे उद्दीष्ट मराठी ब्लॉगिंगमध्ये आपले मोलाचे योगदान देणे हे आहे. या ब्लॉगवर आपल्याला मराठी मध्ये माहिती ,थोर लोकांचे विचार, व्यक्तिमत्व विकास, महापुरुषांची चरित्रे, आरोग्याशी संबंधित उत्तम माहिती, आपली विचारसरणी बदलणारी प्रेरणादायक कथा, अभ्यासाशी संबंधित लेख आणि अशी अनेक प्रकारची मनोरंजक माहिती भेटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

हे सुद्धा वाचा

chia seeds meaning in marathi
माहितीपूर्ण

चिया बिया काय आहेत, त्याचे फायदे | Chia Seeds/Sabja Seeds in Marathi

chia seeds in Marathi - चिया बियाणे खूप फायदेशीर आहेत, या लेखा मध्ये तुम्हाला चिआ सीड्स चे 7 जबरदस्त फायदे
Unique house names in Marathi
मराठी ज्ञान माहितीपूर्ण

अनोखी मराठी घरांची नावे | Royal House Names in Marathi

येथे आम्ही अनेक घरांच्या नावाच्या कल्पना (House Names in Marathi) सूचीबद्ध केल्या आहेत

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !