कुंकुमार्चन करणे म्हणजे काय – What is kunkumarchan
इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरीमधील चरणां पासून प्रारंभ करून तिच्या डोक्या पर्यंत वहावे अथवा इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय.
देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ? – What is kunkumarchan to the goddess
देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणां पासून प्रारंभ करून तिच्या डोक्या पर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय.
कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी ?
कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट ) पात्रात घेऊन सुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटाचा स्पर्श न करता केवल अंगठा तर्जनी व मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणा पासून मस्तका पर्यंत वाहावे अथवा कुंकवाने स्नान घालावे.
कुंकुमार्चनाचे शास्त्र – Science of kunkumarchana
कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्ती तील शक्ती तत्त्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.
कुंकुमार्चन करण्या साठी विषेश दिवसाची जसे पोर्णिमा अमावस्या गुरु पुष्यामृत योग लक्ष्मी पुजन मंगळवार शुक्रवार निवड करावी मूळ कार्यरत शक्ती तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशा तून झाली आहे.
शक्ती तत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्या गंध लहरींच्या सुवासा कडे ब्रह्मांडातील शक्ती तत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्ती तील सगुण तत्त्वाला जागृत करण्या साठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्त्वाला प्रसन्न करणार्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे.
मूळ शक्ती तत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.
फलश्रुती :- अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पण केलेले साठलेले कुंकु एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्य सिध्दी साठी याची सहायता होते.
परमेश्वरावर असलेली श्रद्धा व गुरूंवर असलेली अपार भक्ती यामुळे माणूस आयुष्यात असाध्यही साध्य करू शकतो..!