आरोग्य

Lipoma Meaning in Marathi | लिपोमा म्हणजे काय? जाणून घ्या कारणे, लक्षणे व इलाज

Lipoma Meaning in Marathi

Lipoma in Marathi – कधी कधी आपल्या शरीरात कुठेही गाठ तयार होते. त्याला सामान्य भाषेत लम्प ऑफ फॅट किंवा लिपोमा असेही म्हणतात.

यामुळे जास्त वेदना होत नाहीत, परंतु ते दिसायला विचित्र दिसते. जर ही गाठ अशा ठिकाणी असेल, जी सर्वांना दिसते, तर खूप वाईट वाटते अशा परिस्थितीत काही लोक घराबाहेर पडणेही बंद करतात

जर तुम्हीही अशाच काही समस्येतून जात असाल तर आमचा हा लेख तुम्हाला खूप मदत करू शकतो. आजच्या या लेखात, आम्ही चरबीच्या गाठीची लक्षणे आणि कारणे तसेच चरबीच्या गाठीवर उपचार कसे करावे याबद्दल माहिती देणार आहोत.

लिपोमा काय आहे? – What is Lipoma in Marathi 

लिपोमा चरबीची एक गाठ आहे, लिपोमा या शब्दामध्ये याचा अर्थ दडलेला आहे. लिपोमा या शब्दांमधील पोमा म्हणजे कोणताही एक ट्यूमर आणि लिपिड म्हणजे चरबी. फॅट सेल वाढल्यामुळे, स्नायू आणि त्वचा च्या मध्ये हि गाठ तयार होते. हि गाठ कुठेही येऊ शकते, हि गाठ पोटात, छातीवर,गळ्यात शरीराच्या कोणत्याही अवयवावर येऊ शकते. कारण चरबी शरीरात प्रत्येक जागी असते, आणि जिथे चरबी असते तिथे हि गाठ येऊ शकते.

लिपोमा होण्याची कारणे – Causes of Lipoma in Marathi

लिपोमा होण्याची सटीक करणे कोणताच डॉक्टर सांगू शकत नाही, कारण लिपोमा चा कोणताच सायंटिफिक पुरावा आजपर्यंत भेटलेला नाही. परंतु काही कारण आहेत,

जेनेटिक

जर कुटुंबा मध्ये कोणाला लिपोमा झाला असेल तर तो तुम्हाला हि होऊ शकतो.

जखम झाल्यामुळे

जखम झाल्यानंतर त्या जागेवर लिपोमा होऊ शकतो. याचे काही पक्के पुरावे उपलब्ध नाही पण बहुतांश रुग्णामध्ये हे आढळले आहे.

जन्मजात (अनुवांशिक)

जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढत चालला आहे, तुम्हाला diabetes असेल, तुमचा वजन जास्त असेल किंवा तुम्ही व्यायाम करत नसाल तर अशा लोकांमध्ये लिपोमा होण्याचा धोका अधिक असतो.

हे सुद्धा वाचा – सरोगसी म्हणजे काय, त्यासाठी किती खर्च येतो

लिपोमा ची लक्षणे (Symptoms of Lipoma in Marathi)

लिपोमा चे मुख्य लक्षण शरीरामध्ये गाठ येणे हेच आहे, ज्यामध्ये काही त्रास होत नाही काही रक्तस्त्राव होत नाही. लिपोमा ची गाठ छोट्या मोठ्या अशा आकारात असू शकते. लिपोमा मुख्यत्वे पुरुषामध्ये जास्त आढळतो,१०० मधल्या १-२ पुरुषांना हा आजार असतो.

लिपोमाचे निदान – लिपोमा ची गाठ कशी तपासली जाते ?

डॉक्टर अनेकदा शारीरिक तपासणी करून चरबीच्या गाठी शोधू शकतात. हे स्पर्श करताना मऊ वाटते आणि दुखत नाही. हि गाठ खालील चाचण्यांद्वारे निदान केली जाऊ शकते:

शारीरिक तपासणी

बायोप्सी

एक्स-रे किंवा इतर इमेजिंग चाचणी, जसे की एमआरआय किंवा सीटी स्कॅन

सीटी स्कॅन

-हे स्कॅन एक्स-रे किरणांपेक्षा अधिक तपशीलवार आहे आणि जर शरीरात लिपोमाची उपस्थिती असेल तर हि चाचणी मोठी गाठ दर्शवते.

एमआरआय स्कॅन

-एमआरआय स्कॅन लिपोमाच्या चाचणीसाठी सर्वोत्तम चाचणी आहे. एमआरआय चाचणी सर्व दृष्टीकोनातून फॅटी वस्तुमानाच्या प्रतिमा सादर करते. अनेकदा, डॉक्टर केवळ एमआरआय इमेजिंगवर लिपोमा चे निदान करतात, त्यामुळे बायोप्सीची आवश्यकता पडत नाही.

लिपोमा वर उपचार 

आतापर्यन्त आपण लिपोमा काय आहे, त्याची कारण काय आहेत हे समझून घेतले आता लिपोमा वर उपचार काय आहेत हे आपण बघूया.

शस्त्रक्रिया

लिपोमा वर मुख्य उपचार हा शस्त्रक्रिया हाच आहे. याशिवाय इंजेकशन ने सुद्धा हि गाठ कमी करता येते, आजकाल मोठ्या लिपोमा मध्ये लेझर पद्धतीने हि गाठ काढली जाते जेणेकरून त्याचा निशाण राहू नये.

निष्काळजी होऊ नका

कोमट पाणी पिणे, पचणारे अन्न खाणे हे लिपोमा वर उपचार सांगितले आहे. परंतु शरीराच्या कोणत्याही भागात गाठ दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा गाठी टिकून राहिल्याने व्यक्ती तणावाखाली राहू लागते, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.

गाठ दाबू नये

वैद्यकीय सल्ल्याशिवाय शरीरावर तयार झालेली कोणतीही गाठ दाबू नका. विशेषतः जर गाठ लिपोमाची असेल तर ती दाबल्यावर त्यातील चरबी इकडून तिकडे हलू शकते. अनेक रुग्ण या गाठींबद्दल विचार करतात की ते दाबल्याने अथवा फोडल्याने लहान होतील. मात्र, तसे नाही. दाबल्यामुळे त्यातील अंतर्गत चरबी जाळून आतमध्ये प्राणघातक संसर्ग होऊ शकतो.

या घरगुती उपायांनी काढून टाका लिपोमा ची गाठ

दररोज लिंबू पाणी कापसाच्या ऊनाने गाठे वर लावा, त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.

ऍपल सायडर व्हिनेगर देखील गाठे वर लावता येते, हे शरीराला डिटॉक्सिफाय करते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि रक्त परिसंचरण सुधारते.

गाठे वर हळदीची पेस्ट लावल्याने प्रभावित भाग लवकर बरा होऊ लागतो. हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. ते जळजळ कमी करण्यासाठी आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी मदत करतात.

लसूण ने सुद्धा लिपोमा च्या गाठी वर उपचार केले जाऊ शकतात यामध्ये अँटीमाइक्रोबियल, अँटीऑक्सिडंट, अँटीबैक्टीरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत, जे गाठ कमी करण्यास तसेच बॅक्टेरियापासून दूर ठेवण्यास मदत करतात.

या सर्वांशिवाय जेवणाचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई असलेले भरपूर पदार्थ खा आणि भरपूर पाणी प्या.

हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला हे समजले असेल की लिपोमा, ज्याला आपण एक किरकोळ समस्या मानतो, ती नंतर गंभीर रूप धारण करू शकते.

तसेच काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. कोणतीही समस्या मोठी नसते, फक्त आपला थोडासा निष्काळजीपणा तिला मोठा बनवतो.

तुमच्या शरीरात होत असलेल्या बदलांची नेहमी जाणीव ठेवा.

तुम्हाला या लेखाबाबत इतर काही सूचना किंवा प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्सचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता.

हे सुद्धा वाचा,

प्लेसेंटा पोस्टरियर म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

IVF द्वारे गर्भधारणेची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

सरोगसी म्हणजे काय, त्यासाठी किती खर्च येतो, मुलाचा जन्म कसा होतो

 

Avatar

teamdeeplyquote

About Author

डिपली मराठी - मराठी मध्ये माहिती ! आमचे उद्दीष्ट मराठी ब्लॉगिंगमध्ये मोलाचे योगदान देणे हे आहे. या ब्लॉगवर आपल्याला थोर लोकांचे विचार, महापुरुषांची चरित्रे, आरोग्याशी संबंधित उत्तम माहिती, अभ्यासाशी संबंधित लेख अशी अनेक प्रकारची मनोरंजक माहिती मराठी मध्ये भेटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !