आरोग्य मराठी ज्ञान

मॅकरेल फिशचे ०7 (अविश्वसनीय) फायदे आणि नुकसान | Mackerel Fish information in Marathi

Mackerel Fish in Marathi

Mackerel Fish in Marathi – मासे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात, त्यापैकी एक मॅकरेल मासा आहे. हा एक सामान्य मासा आहे जो अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करतो.

यामध्ये ओमेगा ३ ऍसिड आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. हे घटक हृदयविकार, मेंदूचे आरोग्य, हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात.

भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मॅकरेल मासे जास्त खाल्ले जातात. हा मासा बहुतांशी समुद्राच्या किनार्‍यावर आढळतो.

आजच्या लेखात आम्‍ही तुम्‍हाला (Mackerel Fish information Marathi)  मॅकेरल माशाचे पोषक घटक , फायदे आणि तोटे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. 

मॅकरेल माशाला मराठी मध्ये काय बोलतात ?

what is mackerel fish called in marathi  – मॅकेरेल माशा ला मराठीत बांगडा असेही म्हणतात, या माशाला भारताच्या अनेक रांझ्याच्या वेगळ्या नावाने ओळखळते जाते जसे कि कोंकणी भाषेत बांगडी गुजराती मध्ये बांगडी, बंगाली मध्ये काजोल गौरी, मल्याळम मध्ये आयला, तामिळ मध्ये कानांक लुठी, आणि कन्नड मध्ये बांगुडे म्हणतात.

king mackerel fish in marathi – हे मासे मुख्यत्वे प्रशांत महासागर आणि हिंद महासागरात आढळतात . मॅकरेलची एक प्रजाती किंग मॅकरेल जी पश्चिम अटलांटिक महासागर आणि मेक्सिकोच्या आखातामध्ये आढळते.

किंग मॅकेरलची एक प्रजाती भारतात देखील आढळते जी इंडो-पॅसिफिक किंग मॅकेरल म्हणून ओळखली जाते. या माशाचे वजन 45 किलो पर्यंत असू शकते. हे मासे हिंदी महासागर आणि त्याच्या सभोवतालच्या समुद्रात आढळतात.

मॅकरेल माशा मध्ये असणारे पोषक घटक?

मॅकेरल माशांमध्ये अनेक पोषक घटक असतात, या माशांमध्ये कॅलरीज, चरबी, सोडियम, फायबर, प्रथिने, साखर, कार्बोहायड्रेट, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात आढळते.

मॅकरेल मासे खाण्याचे फायदे (Mackerel Fish Benefites in Marathi)

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर

आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते, एक चांगले कोलेस्ट्रॉल आणि एक वाईट कोलेस्ट्रॉल. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढले तर हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत, मॅकरेल फिश फायदेशीर आहे, यामध्ये तेलकट गुणधर्म आहे जी खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते तसेच चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल सामान्य होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

सांधेदुखीमध्ये फायदेशीर

संधिवात असलेल्या लोकांसाठी मॅकरेल फिशचे सेवन खूपच उपयुक्त आहे. या माशामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.

आपल्या आहारात या माशांचा समावेश केल्यास संधिवात होण्याचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

बरेच लोक त्यांचे वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे डाएट follow करतात आणि वजन कमी न झाल्यामुळे ते निराश होतात.

तर अशा लोकांसाठी मॅकरेल मासे चांगला उपाय आहे. मॅकेरल फिशमध्‍ये फायबरचे प्रमाण चांगले असते जे फॅट कमी करण्यास मदत करून पचनक्रिया सुधारवते.

काही अभ्यासांनुसार, या माशात ओमेगा 3 ऍसिडचे गुणधर्म आहेत, जे वजन वाढू देत नाही आणि पचन क्रिया सामान्य करते.

कर्करोग रोखण्यासाठी फायदेशीर

कर्करोग हा एक घातक आजार आहे ज्यावर सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करणे आवश्यक आहे. तथापि, मॅकेरल मासे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी फायदेशीर मानले जातात कारण त्यात अँटीऑक्सिडेंट, ओमेगा 3 ऍसिड, व्हिटॅमिन बी 12 आणि सेलेनियम असतात.

हे घटक कर्करोगाच्या कणांचा नाश करण्यास मदत करतात. या कॅन्सर च्या प्रकारांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर, किडनी कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर इ. समाविष्ट आहे.

तुमचा कर्करोग गंभीर स्थितीत असल्यास, हे मासे खाण्यापूर्वी डॉक्टरांकडून निदान किंवा सल्ला घेणे चांगले.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त

आपल्या शरीरातील रोगांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. मॅकेरल फिशमध्ये अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करतात तसेच हृदयरोगाचा धोका कमी करतात.

हे मासे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात

काही अभ्यासानुसार, मॅकरेल माशांच्या सेवनाने मधुमेहाचा धोका कमी होतो. यामध्ये चरबीचे प्रमाण चांगले असते जे मधुमेह रोखण्यासाठी प्रभावी आहे.

याशिवाय मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे मासे फायदेशीर आहेत याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ लागते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो.

जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर या माशांचा आहारात नक्कीच समावेश करा.

हृदयविकारासाठी फायदेशीर

मॅकेरल फिश मध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटी ऍसिड मुले हृदयविकाराचा धोका कमी होतो. याशिवाय मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड सारखे गुणधर्म तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. यामुळे स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

मॅकेरल फिशचे साइड इफेक्ट्स

मॅकरेल फिशच्या फायद्यांसोबतच काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये तोटे देखील आहेत .
मॅकरेल मासे गर्भवती महिलांनी खाऊ नये कारण ते बाळासाठी हानिकारक आहे.
स्तनपान देणाऱ्या महिलांनी मॅकेरल माशांचे सेवन करू नये.
ज्या लोकांना माशांच्या सेवनाची ऍलर्जी आहे त्यांनी मॅकेरल फिशचे सेवन करू नये.
तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर ते हे मशे खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
काही लोकांमध्ये ऍलर्जीमुळे जुलाब, मळमळ, उलट्या, तोंडात सूज येऊ शकते अशा व्यक्तींनी याचे सेवन टाळावे.  

सतत विचारले जाणारे प्रश्न

दररोज मॅकरेल मासे खाणे चांगले आहे का?
नाही, मॅकरेल मासे आठवड्यातून दोनदा सेवन केले जाऊ शकतात. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.

मॅकरेल फिश त्वचेसाठी चांगले आहे का?
होय, ओमेगा 3 फॅटी ऍसिड मॅकेरल माशांमध्ये असते. ते त्वचेची जळजळ कमी करतात आणि मुरुमांपासून आराम देतात.

मॅकरेल मासे मानवांसाठी महत्वाचे का आहेत?
मॅकरेल मासे कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अनेक जीवनसत्त्वे पोषक तत्वांनी समृद्ध आहे. अशा स्थितीत त्वचा, केस, वजन कमी होणे, सांधेदुखी आणि इतर आरोग्य समस्यांमध्ये ते फायदेशीर ठरू शकतात.

मॅकरेल मासे चिकनपेक्षा निरोगी आहेत का?
मॅकरेल मासे ओमेगा -3 ने समृद्ध असतात, तर चिकनमध्ये प्रथिने असतात, त्यामुळे मासे आणि चिकनमध्ये कोणते आरोग्यदायी आहे हे सांगणे थोडे कठीण आहे.

मॅकरेल फिश खाण्याचे फायदे आणि नुकसान याबद्दलचा हा लेख तुम्हाला कसा वाटला (Mackerel Fish information in Marathi ), आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

हे सुद्धा वाचा –

तुरटीचे ‘हे’ 10 गुणकारी फायदे आफ्टरशेवसाठी आहेत लाभदायी

शमी वनस्पती (संपूर्ण माहिती) | शमीच्या झाडाची पूजा केल्याने होणारे फायदे

अशोकरिष्ट टॉनिक उपयोग, मात्रा आणि नुकसान

जवस/अळशी खाण्याचे फायदे 

बार्ली चे फायदे, उपयोग, नुकसान (संपूर्ण माहिती)

Avatar

teamdeeplyquote

About Author

डिपली मराठी - मराठी मध्ये माहिती ! आमचे उद्दीष्ट मराठी ब्लॉगिंगमध्ये मोलाचे योगदान देणे हे आहे. या ब्लॉगवर आपल्याला थोर लोकांचे विचार, महापुरुषांची चरित्रे, आरोग्याशी संबंधित उत्तम माहिती, अभ्यासाशी संबंधित लेख अशी अनेक प्रकारची मनोरंजक माहिती मराठी मध्ये भेटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

हे सुद्धा वाचा

Unique house names in Marathi
मराठी ज्ञान माहितीपूर्ण

अनोखी मराठी घरांची नावे | Royal House Names in Marathi

येथे आम्ही अनेक घरांच्या नावाच्या कल्पना (House Names in Marathi) सूचीबद्ध केल्या आहेत
Kabaddi Information in Marathi
मराठी ज्ञान माहितीपूर्ण

कब्बड्डी खेळाची संपूर्ण माहिती | जाणून घ्या कब्बड्डी खेळाचा इतिहास

Kabaddi Information in Marathi – कबड्डी हा भारतात उगम पावलेला सांघिक खेळ आहे व भारतातील सर्वात जुन्या व प्रसिद्ध खेळांपैकी

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !