माहितीपूर्ण

जाहिरात लेखन म्हणजे काय व ते कसे करावे | Marathi Jahirat Lekhan

Marathi Jahirat Lekhan

मित्रांनो आज आपण ग्राहकवादी युगात जगत आहोत. जेथे ग्राहकाला जगातील प्रत्येक आराम मिळवायचा आहे आणि त्याचा उपभोग घ्यायचा आहे. त्यासाठी तो कठोर परिश्रम करून आपली आर्थिक स्थिती बळकट करण्याचा सतत प्रयत्न करत असतो.

कदाचित उत्पादक कंपन्यांना ग्राहकांची हि मनस्थिती खुप चांगल्या प्रकारे समझली आहे त्यामुळे आता ते ग्राहकांच्या गरजेनुसार सर्वोत्तम वस्तू तयार करतात आणि ग्राहकांसमोर ते अधिक चांगल्या प्रकारे सादर करतात जेणेकरून ग्राहक वस्तूकडे आकर्षित होईल आणि ते खरेदी करेल.

आजकाल कंपनी प्रत्येक उत्पादनाच्या जास्तीत जास्त विक्रीसाठी आपले सर्वस्व पणाला लावते. प्रभावी आणि आकर्षक जाहिरात तयार करण्यासाठी ते लाखो रुपये खर्च करतात जेणेकरून लोक अधिकाधिक आकर्षित होतील आणि वस्तू विकत घेतील.

एका सर्वेक्षणानुसार, एक माणूस दिवसाला सरासरी ५,००० हून अधिक जाहिरात संदेश वाचतो . या जाहिराती अनेक shapes, आकार आणि रूपांमध्ये असतात.

मित्रांनो जाहिरात लेखन ही एक सृजनशील कला आहे त्यामुळे यावर प्रभुत्व मिळवणे ही आजच्या काळाची गरज आहे,

आजच्या या पोस्ट मध्ये आपण जाहिरात लेखन (Marathi Jahirat Lekhan) बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

इयत्ता नावाची ते बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये जाहिरात लेखन हा प्रश्न हमखास विचारला जातो. त्यादृष्टीने या पोस्ट मध्ये दिलेली माहिती आपणास नक्कीच उपयुक्त ठरेल. 

जाहिरात लेखन म्हणजे काय : 

जाहिरात लेखन म्हणजे एखाद्या गोष्टीची ‘विशेष माहिती देणे’. ‘एखाद्या वस्तू किंवा सेवांबद्दल सर्जनशील आणि आकर्षकपणे जाहिरात लिहिणे याला जाहिरात लेखन म्हणतात.

जाहिरातीला इंग्रजी भाषेत Advertising म्हणतात. या इंग्रजी भाषेतील जाहिरात हा शब्द ‘Advertere’ या लॅटिन शब्दापासून उद्भवला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ वळणे असा होतो. 

जर कोणत्याही वस्तुस्थितीची वारंवार पुनरावृत्ती झाली, तर ती खरी वाटते – ही कल्पना जाहिरातींचा मूलभूत घटक आहे.

उदाहरणार्थ, बाजारात जेव्हा एखादी वस्तू येते, तेव्हा त्याचे स्वरूप- रंग-रचना आणि गुणवत्ता केवळ जाहिरातींद्वारे च ओळखली जाऊ शकते आणि त्यातूनच ग्राहक योग्य आणि अयोग्य वस्तूंमधला फरक ओळखू शकतो. 

हे सुद्धा वाचा – भारत देशाची २९ राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची राजधानी

 

जाहिरातीचे प्रकार

उत्पादन किंवा सेवेची विक्री करण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या सामूहिक प्रचाराला जाहिरात म्हणतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि माल विकण्यासाठी जाहिरात हे एक उत्तम माध्यम आहे.

तसे बघायला गेले तर जाहिराती अनेक प्रकारच्या असतात, पण इथे आपण महत्वाच्या ६ जाहिरातींची तपशीलवार माहिती घेणार आहोत:

• स्थानिक जाहिराती

• राष्ट्रीय जाहिरात
• वर्गीकृत जाहिराती
• औद्योगिक जाहिरात
• लोककल्याण जाहिराती
• माहितीपूर्ण जाहिराती

 

स्थानिक जाहिरात

यांचे प्रसार क्षेत्र तुलनेने कमी असते आणि या प्रकारच्या जाहिराती स्थानिक पातळीवर उत्पादनाची विक्री वाढविण्यासाठी वापरल्या जातात.

यामध्ये आकर्षक सवलती, नामांकित योजनांचा किंवा विशिष्ट प्रकारच्या स्थानिक उत्पादनाच्या लोकप्रिय उत्पादनाचा समावेश असतो.

या जाहिराती थेट विक्री वाढवणाऱ्या आहेत आणि स्थानिक पत्रे, रेडिओ, टीव्ही, केबल नेटवर्क, बॅनर, पोस्टर्स, स्लाईड्स इत्यादींद्वारे प्रसारित केल्या जातात.

 

राष्ट्रीय जाहिरात

राष्ट्रीय जाहिराती राष्ट्रीय स्तरावरील उत्पादन किंवा सेवेची जाहिरात करतात. आपल्या देशात अनेक बोलल्या जात भाषा असल्याने राष्ट्रीय जाहिराती एकापेक्षा अधिक भाषेत तयार केल्या जातात.

प्रत्येक कंपनीला आपला ब्रँड प्रसिद्ध करण्यासाठी अशा जाहिरातींचा आधार घ्यावा लागतो.

सौंदर्यप्रसाधने, घरगुती उपकरणे, मोबाइल सेवा इ. यांसारख्या कंपन्याची जाहिरात राष्ट्रीय स्तरावर केली जाते,

 

वर्गीकृत जाहिरात

वर्गीकृत जाहिराती बऱ्याचदा  स्थानिक गरजा आणि माहितीवर आधारित असतात.

अशा जाहिराती वर्तमानपत्रात किंवा मासिकांमध्ये एका विशिष्ट पानाखाली आणि विशिष्ट ठिकाणी विशिष्ट शीर्षकाखाली प्रकाशित केल्या जातात.

खरेदी, विक्री, गरज आहे, रोजगार, शैक्षणिक, वैवाहिक आणि हरवलेले इत्यादी अशा प्रकारच्या जाहिराती या प्रकारात मोडतात.

वर्गीकृत जाहिरातींचे मूल्य खूप कमी असते. अनेकदा या जाहिरातीचा मायना तीन-चार ओळींमध्ये च सांगितलं जातो.

अशा जाहिरातींमध्ये चिन्हांचा किंवा चित्रांचा वापर होत नाही, या जाहिराती आकर्षक रित्या बनवल्या जातात. या जाहिराती मुख्यत्वे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बनवलेल्या नसतात.

 

औद्योगिक जाहिरात

औद्योगिक जाहिरातीचा उपयोग या कच्च्या मालाची किंवा उपकरणांची खरेदी/विक्री वाढवणे यासाठी केला जातो.

या जाहिरातींचा मुख्य उद्देश सामान्य माणसाला आकर्षित करणे हा नाही तर औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती, आस्थापना आणि उत्पादकांना आकर्षित करणे हा असतो.

 

लोककल्याण संबंधित जाहिराती

लोककल्याण संबंधित जाहिरातीच चा उपयोग लोकांना विशिष्ट समस्येची जाणीव करून देण्यासाठी केला जातो.

प्रदूषण समस्या, शिक्षण समस्या, स्त्रीभ्रूण हत्या समस्या इत्यादींबद्दल लोकांना संवेदनशील व जागरूक करण्याच्या संदर्भातील जाहिराती या प्रकारात मोडतात.

 

माहितीपूर्ण जाहिरात

या जाहिराती जनतेला शिक्षित करणे, त्यांचे जीवनमान उंचावणे, सांस्कृतिक वृद्धि, धर्म आणि आध्यात्मिक यासाठी वापरल्या जातात.

सुधारणा, आंतरराष्ट्रीय सलोखा, वन्यजीव संरक्षण, वाहतूक सुरक्षा इत्यादी क्षेत्रांमध्ये जनतेच्या कल्याणाच्या उद्देशाने माहिती देणे व लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या जाहिरांतीमागचा मुख्य उद्देश आहे.

खालील कामांसाठी या जाहिराती मुख्यत्वे वापरल्या जातात :

1. नवीन वस्तू आणि सेवांची माहिती देणे.
२. एखाद्या गोष्टीची उपयुक्तता आणि महत्व सांगून लोकांचे लक्ष वेधून घेणे
3. ग्राहकांचा वस्तूंवर रस आणि विश्वास निर्माण करणे.
4. विशेष सवलती इत्यादींची माहिती देऊन ग्राहकांची मागणी वाढवणे.
5. वस्तू खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे.
6. इतर उत्पादन कंपन्यांच्या उत्पादनांची तुलनात्मक माहिती देते.
7. उत्पादन कंपन्यांना बाजारात स्थैर्य प्रदान करणे.

हे सुद्धा वाचा – ७००+ मराठी समानार्थी शब्दांचा संग्रह

 

जाहिरातींची विविध माध्यमे

जी प्रसार माध्यमे आहेत तीच जाहिरातींचे माध्यम सुद्धा आहेत. जाहिराती फक्त प्रचारासाठी असतात. त्यामुळे जाहिरातींसाठी सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांचा वापर केला जातो.

ही माध्यमे पुढीलप्रमाणे आहेत: 

१.मुद्रण माध्यम – वर्तमानपत्रे, मासिके.
२.इलेक्ट्रॉनिक माध्यम
(अ) ऑडिओ माध्यम – रेडिओ
(ब) ऑडिओ व्हिज्युअल माध्यम – टेलिव्हिजन, इंटरनेट.
३.चित्रपट माध्यम – चित्रपट, नाटक
४.इतर माध्यमे – होर्डिंग, पत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, प्रदर्शने, स्टिकर, भेटवस्तू, डायरी, कॅलेंडर इ.

 

जाहिरात लेखन कसे करावे (Jahirat Lekhan in Marathi for 9th & 10th Class)

How to Write Jahirat Lekhan in Marathi  – लेखकाने जाहिरात प्रत तयार करताना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून ग्राहकाला खालील गोष्टी कळतील :

  1. तुम्ही जाहिराती मध्ये सांगितलेली वस्तू कुठे खरेदी करू शकाल?
  2. ते उत्पादन त्याच्यासाठी फायदेशीर ठरेल याची ग्राहकाला खात्री पटेल.
  3. जाहिरात ग्राहकाच्या आवडीनिवडी च्या अनुकूल वाटेल.
  4. जाहिरात वाचून ग्राहकाला उत्पादन खरेदी करण्याची इच्छा निर्माण होईल.
  5. जाहिरात सोपी आणि समजण्याजोगी वाटेल, जाहिरातीत केलेल्या दाव्यावर ग्राहकाचा विश्वास बसेल.
  6. जाहिरातीचे प्रत्येक वाक्य आणि शब्द ग्राहकाला अनुकूल वाटतील.
  7. जाहिरातींची भाषा त्याच्या सभोवतालच्या परिसराचे प्रतीक असल्याचे दिसेल.
  8. जाहिराती मध्ये प्रतिस्पर्धी वस्तूंच्या दुर्गुणांचा उल्लेख करण्याऐवजी तुमचे गुण आणि वैशिष्ट्य दर्शवणे हे तुमच्या उत्पादनाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतील.

याशिवाय, लेखकाने मराठी जाहिरात लेखन करताना खालील मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे:

1. शीर्षक

कोणत्याही जाहिरातीची सजावट किंवा मांडणी शीर्षकाशिवाय केलीच जाऊ शकत नाही. शीर्षक हा जाहिरातींचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

जाहिरातीचा पहिला मसुदा तयार करताना कॉपी लेखकाने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, जे शीर्षक लिहिले आहे ते ग्राहक, वाचक यांचे लक्ष वेधून घेऊ शकेल.

शीर्षक कमीत कमी शब्दांचं सोपे आणि प्रभावी असले पाहिजे व महत्वाचे म्हणजे जाहिरातीच्या मुख्य मुद्द्याला धरून असल पाहिजे.

उदाहरणार्थ – खालील नाव आपण ऐकली के आपोआप आपल्या नजरेसमोर त्या उत्पादनाचे ब्रँड डोळ्यासमोर येतात
ग्लुकोज – पार्ले उत्पादन
५०-५० – ब्रिटानिया
नवरत्न तेल
झंडू केसरी जीवन

 

2. उपशीर्षक

जाहिरातींमध्ये फक्त शीर्षकानेच काम नाही चालत तर वरच्या ओळीत जे काही बोलले गेले आहे, त्याची ग्राहकाला पुन्हा जाणीव झाली पाहिजे, याकडे सुद्धा लेखकाने विशेष लक्ष दिले पाहिजे.

हे उपशीर्षक प्रत्यक्षात शीर्षक आणि कथन यांच्यातील माध्यम म्हणून काम करते. शीर्षक वाचल्यानंतर वाचक किंवा ग्राहक यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे उत्तर उपशीर्षकात दडलेले असते.

 

3. बॉडी कॉपी –

शीर्षक आणि उपशीर्षक लिहिल्यानंतर वस्तू किंवा उत्पादनाची विस्तृत माहिती देण्यासाठी बॉडी कॉपी चा वापर होतो.

याच्या माध्यमातून लेखक ग्राहकांच्या मनात उच्चशक्ती आणि खरेदी करण्याची भावना करू शकतो .

लेखकाने जाहिरात लेखन करताना या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कि आपली जाहिरात इतकीही छोटी नसावी के ग्राहकाची उत्सुकता अर्धवट राहील व आपली जाहिरात इतकीही मोठी नसली पाहिजे के ग्राहकाला वाचता वाचताच कंटाळा येईल.

जाहिरातीच्या शेवटी ग्राहकाला  त्या वस्तूबद्दल काही कृती करण्यासाठी सांगितलं पाहिजे जसे कि आजच खरेदी करा, मोफत नमुन्यांसाठी लिहा, अधिक माहितीसाठी संपर्क करा, त्वरित संपर्क करा, इत्यादी

 

4. जाहिरात सजावट (मांडणी, चित्र)-

 जाहिरात लेखन मध्ये सजावट करताना (मांडणी, चित्र, रंगांची निवड, मोकळी जागा, टाइप सेटिंग्ज इ.) या सगळ्या गोष्टींना विशेष महत्त्व आहे

जाहिरात सजावट करताना संतुलित, प्रभावी रंग निवडले पाहिजेत. जाहिरातीचे सादरीकरण त्याच्या आकर्षक मुद्रण आणि लिहण्याच्या प्रकारावर सुद्धा अवलंबून असते.

6. घोषवाक्य –

आकर्षक आश्वासने आणि घोषवाक्ये ग्राहकाला आकर्षित करू शकतात. कधीकधी तर घोषवाक्य वाचूनच वस्तू खरेदी केल्या जातात.

7. ट्रेडमार्क आणि लोगो –

सर्व जाहिरातींमध्ये उत्पादनाचे ट्रेडमार्क किंवा आयडेंटिटी मार्क लोगो छापलेले असतात आणि त्यामुळेच जाहिरातींवर नजर जाते. तसेच ट्रेडमार्क आणि लोगो हे त्या ब्रॅण्डची ओळख असतात.
उदाहरणार्थ
निरमा – डान्सिंग गर्ल
जॅग्वार कार – जॅग्वार प्राण्याचं च चिन्ह 

ट्रेडमार्क नोंदणीकृत असतात आणि कंपनीची स्वतःची मालमत्ता असतात . बाजारात कंपनीचे नाव,लोगो अशा पद्धतीने किंवा अशा एका विशिष्ट शैलीत तयार केले जातात जेनेकरून ते कंपनीच्या product किंवा उद्देशाला अनुसरून असेल.

लक्षात ठेवा ट्रेडमार्क किंवा एखाद्याचा लोगो हे त्या product किंवा कंपनी ची एक विशिष्ट ओळख असते जे आपण कॉपी नाही करू शकत.

 

मित्रांनो आशा करतो की हि जाहिरात लेखन इन मराठी पोस्ट आपणास उपयोगी ठरली असेल आणि हा लेख वाचल्यानंतर आपणही योग्य जाहीरात लिहू शकाल.

आपल्याला हि पोस्ट कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

धन्यवाद..

हे सुद्धा वाचा

महा ई सेवा केंद्र कसे सुरू करावे :पात्रता, शुल्क, नोंदणी प्रक्रिया (संपूर्ण माहिती)

मेस्मा कायदा म्हणजे काय (संपूर्ण माहिती)

Avatar

admin

About Author

आमचे उद्दीष्ट मराठी ब्लॉगिंगमध्ये आपले मोलाचे योगदान देणे हे आहे. या ब्लॉगवर आपल्याला मराठी मध्ये माहिती ,थोर लोकांचे विचार, व्यक्तिमत्व विकास, महापुरुषांची चरित्रे, आरोग्याशी संबंधित उत्तम माहिती, आपली विचारसरणी बदलणारी प्रेरणादायक कथा, अभ्यासाशी संबंधित लेख आणि अशी अनेक प्रकारची मनोरंजक माहिती भेटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

हे सुद्धा वाचा

chia seeds meaning in marathi
माहितीपूर्ण

चिया बिया काय आहेत, त्याचे फायदे | Chia Seeds/Sabja Seeds in Marathi

chia seeds in Marathi - चिया बियाणे खूप फायदेशीर आहेत, या लेखा मध्ये तुम्हाला चिआ सीड्स चे 7 जबरदस्त फायदे
Unique house names in Marathi
मराठी ज्ञान माहितीपूर्ण

अनोखी मराठी घरांची नावे | Royal House Names in Marathi

येथे आम्ही अनेक घरांच्या नावाच्या कल्पना (House Names in Marathi) सूचीबद्ध केल्या आहेत

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !