माहितीपूर्ण

मराठी कोडी व उत्तरे | Marathi Puzzles with Answers for WhatsApp

Marathi Puzzles

जर तुम्हाला तुमचा मेंदू अधिक तीक्ष्ण करायचा असेल तर खाली दिलेली कोडी आपल्याला मदत करू शकतात.

संशोधनात असे आढळले आहे की, कोडे सोडवण्यासाठी आपण जेवढे आपले डोकं लावतो , त्यामुळे आपल्या मेंदूची क्षमता वाढण्यास मदत होते.

आज आम्ही आपल्यासाठी मजेदार ज्ञानवर्धक कोडी आणली आहेत जी आपल्याला आपल्या मेंदूचा चांगला व्यायाम करण्यास भाग पाडतील. 

चला बघूया आपण मराठी मधील सर्वोत्तम कोडी सोडवू शकता का?

 

Marathi Puzzles with Answers

 

  • एक माणूस ३० दिवस झोपला नाही, पण तरी त्याला काहीच problem नाही झाला? मला सांग कसं?
   उत्तर: कारण तो रात्री झोपत होता.

 

 • तुम्ही रिकाम्या टोपलीत किती केळी ठेवू शकता?
  उत्तर : फक्त एक. पहिल्यांदा बास्केटमध्ये केळी ठेवताना टोपली रिकामी होती, पण त्यानंतर कितीही वेळा केळी ठेवली तरी ती टोपली रिकामी म्हटली जाणार नाही.

 

 • एका टोपलीत १२ केळी आहेत. त्यापैकी ५ केळी घेतल्यास तुमच्याकडे किती केळी असतील?
  उत्तर : जर तुमचे उत्तर ७ असेल तर तुमचे उत्तर चुकीचे आहे. योग्य उत्तर ५ आहे कारण कोडे आपल्याला किती केळी असतील हे विचारत आहे. बास्केटमध्ये किती केळी शिल्लक राहतील हे नाही. बास्केटमधून ५ केळी घेतल्यावर तुमच्याकडे फक्त ५ केळी शिल्लक राहतील.

 

 • असं काय आहे ज्याच्याकडे रिंग आहे पण घालायला बोट नाही?
  उत्तर : फोन

 

 • एक माणूस बाथरूममध्ये गेला आणि त्याने स्वत: ला त्याच्या डोळ्याच्या मध्यभागी गोळी मारली. तरीही तो माणूस वाचला. मला सांग कसं?
  उत्तर : कारण त्याने आरशात गोळी झाडली.

 

 • आपण एक बस ड्रायव्हर आहात. बस रिकामी सुरू होते. पहिल्या स्टॉपवर ४ लोक चढतात. दुसर्या स्टॉपवर ८ लोक चढतात आणि ३ उतरतात. तिसऱ्या स्टॉपवर २ लोक खाली उतरतात आणि ४ लोक चढतात. तर मला सांगा बस चालकाच्या डोळ्यांचा रंग काय आहे?
  उत्तर : आपण बस ड्रायव्हर आहात (कोड्यातील पाहिलं वाक्य वाचा) . त्यामुळे बस चालकाचा डोळ्याचा रंग तुमच्यासारखाच असेल.

 

 • बहुतेक लोकांना मीच घाबरवतो, मी इशारा न देता हल्ला करू शकतो कारण मला थांबवता येत नाही.मी काय आहे?
  उत्तर : मृत्यू

Marathi Puzzles with Answers for WhatsApp

 

 • माझे तीन अक्षरांचे नाव,पहिला अक्षर काढला तर उरतो राम, २र काढला तर फळाचे नाव आणि ३र काढला तर करतो कापण्याचे काम
  मला सांग माझं नाव काय आहे?
  उत्तर – आराम

 

 • असं काय आहे जे पाणी देताच मरते?
  उत्तर:आग

 

 • जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही पिऊ शकता
  जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता
  आणि जर थंडी वाजेल तर तुम्ही ते जाळू शकता.
  मला सांगा की ते काय आहे?
  उत्तर : नारळ

 

 • रंगाने काळी आहे, ती प्रकाशात दिसते पण अंधारात दिसत नाही
  मला सांगा की ते काय आहे?
  उत्तर : सावली

 • सर्वेशच्या वडिलांना 4 मुले आहेत
  सुरेश
  रमेश
  गणेश
  चौथ्याचे नाव सांगा?
  उत्तर : चौथ्याचे नाव सर्वेश आहे. कारण सर्वेशच्या वडिलांच्या मुलांबद्दल बोललं जात आहे, ज्यापैकी सर्वेश एक आहे.

 

 • असे काय आहे जेव्हा आपण जागे असता तेव्हा ते काय राहते?
  झोप आल्यावर पडतो.
  उत्तर – पापण्या

 

 • दिसत नाही पण परिधान केले आहे
  हे एका स्त्रीचे रत्न आहे
  उत्तर – लाज

 

 • असं काय आहे जे पती पत्नीला देऊ शकतो? पण बायको आपल्या नवऱ्याला देऊ शकत नाही.
  उत्तर : आडनाव (लग्नानंतर स्त्रीचे आडनाव पतीच्या स्वत:च्या आडनावाशी जोडले जाते

 

 • असं काय आहे जे आपण उचलता आणि ठेवता आणि त्याशिवाय आपण कुठेही जाऊ शकत नाही.
  उत्तर – पाऊल

 

 • अशी कोणती गोष्ट आहे जे मे मध्ये असते पण आणि डिसेंबरमध्ये नाही
  ते आगीत आहे पण पाण्यात नाही.
  उत्तर – गर्मी 

हे सुद्धा वाचा – मखाना खाण्याचे फायदे 

Marathi Funny Puzzles

 

 • काही मराठी चित्रपटांची नावे ओळखा पाहू..
  1)🔩 🎨
  2) 🌍 दारी
  3) ⌚ पास
  4) 💉 🌅 🍋 te
  5) 👃💨
  6) 💣💥
  7) ♦ 👑
  8) 👆डाव 💀
  9) ➖➖➖👦
  10) 💘 👦👧 📖
  11) 7⃣ आत 🏠
  Its challenge…👍👍👍उत्तर : 1. नटरंग
             2. दुनियादारी
             3. Time पास
             4. Dr. प्रकाश आमटे
             5. नाकाबंदी / श्वास
             6. धूम धडाका
             7. चौकट राजा
             8. एक धाव भूताच
             9. बिनकामाचा नवरा
            10. प्यार वाली लव्ह स्टोरी
            11. सातच्या आत घरात 

 

 • एक माणूस आपल्या बायकोला मारतो आणि तिच्या शरीराला झाडा-झुडुपात लपवतो.
  दुसऱ्या दिवशी पोलिस त्या व्यक्तीला फोन करून सांगतात की, त्याच्या बायकोची हत्या झाली आहे आणि त्या व्यक्तीला लगेचच गुन्हा घडलेल्या घटनास्थळी येण्यास सांगतात.
  तो माणूस घटनास्थळी पोहचताच पोलीस त्याला अटक करतात. पोलीस त्या व्यक्तीला अटक का करतात?
  उत्तर – त्या माणसाच्या बायकोचे शरीर ज्याठिकाणी लपवलेले असते, त्याचा पत्ता पोलिसांनी त्या माणसाला सांगितलेला नसतो. 👮

 

 • पाणी नाही, पाऊस नाही, 
  तरी रान कसं हिरवं ,
  कात नाही,चुना नाही, 
  तरी तोंड कसं रंगल🤔

  उत्तर: पोपट

   

 •  चार खंडांचा एक शहर,चार विहीरी  बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी 
  आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!!🤔
  उत्तर: कॅरम बोर्ड गेम   आहे मला मुख,परंतु खात नाही, दिसते मी झोपलेली,पण असते पळतही,
  माझ्याशिवाय तुमचे जगणेच शक्य नाही, वहा तुम्ही माझी थोडीशी कळजीही, 
  मी कोण काढा शोधुन,नाहीतर बें म्हणा मागून 🤔
  उत्तर: नदी

 

 • अशी कोणती जागा आहे,
  जेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात..
  टिप :- कृपया!!! हुशारानेच उत्तर द्यावे,
  प्रश्र्न जरा निट वाचा मगच उत्तर द्या,
  लावा आता डोकं…
  All The Best!   
  उत्तर: स्मशानभूमी मध्ये १०० लोक गेले की प्रेताला ठेऊन ९९ च परत येतात.

 

 • एकदा एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची मुभा दिली जाते, परंतु त्यासाठी त्याला तीनपैकी एका खोलीतून प्रवेश करायचा असतो.
  पहिल्या खोलीत भयंकर अशी आग आहे,
  दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहे, कि ज्यांचा त्याच्या पाय ठेवण्याने भयानक स्फोट होऊ शकतो.
  तिसऱ्या खोलीत एक सिंह आहे, कि ज्याने मागच्या तीन वर्षांत काहीही खाल्लेलं नाही.
  तर त्या कैद्याने कोणत्या खोलीतून गेले पाहिजे?
  उत्तर – तिसऱ्या खोलीतून. कारण मागच्या तीन वर्षापासून काहीही न खाल्लेला सिंह जिवंतच नसेल. 😀 

मला आशा आहे की तुम्हाला ही सर्व marathi kodi तुम्हाला नक्कीच आवडली असतील आणि आपण मजा केली असेल तसेच यामुळे आपल्या मेंदूचा व्यायामही झाला असेल.

आपण खालील कंमेंट बॉक्समध्ये आम्हाला comment लिहून आपले मत आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि या पोस्ट मध्ये जर काय कमतरता असेल किंवा ती कशी वाटते हे देखील आम्हाला सांगू शकता.

जर तुम्हाला या पोस्ट मध्ये स्वत:चं कोडं जोडायचं असेल, तर तुम्ही ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.

Avatar

admin

About Author

आमचे उद्दीष्ट मराठी ब्लॉगिंगमध्ये आपले मोलाचे योगदान देणे हे आहे. या ब्लॉगवर आपल्याला मराठी मध्ये माहिती ,थोर लोकांचे विचार, व्यक्तिमत्व विकास, महापुरुषांची चरित्रे, आरोग्याशी संबंधित उत्तम माहिती, आपली विचारसरणी बदलणारी प्रेरणादायक कथा, अभ्यासाशी संबंधित लेख आणि अशी अनेक प्रकारची मनोरंजक माहिती भेटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

हे सुद्धा वाचा

chia seeds meaning in marathi
माहितीपूर्ण

चिया बिया काय आहेत, त्याचे फायदे | Chia Seeds/Sabja Seeds in Marathi

chia seeds in Marathi - चिया बियाणे खूप फायदेशीर आहेत, या लेखा मध्ये तुम्हाला चिआ सीड्स चे 7 जबरदस्त फायदे
Unique house names in Marathi
मराठी ज्ञान माहितीपूर्ण

अनोखी मराठी घरांची नावे | Royal House Names in Marathi

येथे आम्ही अनेक घरांच्या नावाच्या कल्पना (House Names in Marathi) सूचीबद्ध केल्या आहेत

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !