मराठी ज्ञान माहितीपूर्ण

Meditation in Marathi : ध्यानाचे फायदे, ध्यान कसे करावे (संपूर्ण माहिती)

meditation meaning in marathi

ध्यान म्हणजे काय? – Meditation in Marathi

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे – डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते जी चांगले आरोग्य, मनःशांती व जीवनाच्या विवेकज्ञानाकडे नेते.

ध्यानाचे फायदे – Benefits of Meditation in Marathi

केवळ आनापानसति ध्यानच माणसाला आध्यात्मिक आरोग्य देऊ शकते. आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे. ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !

ताबडतोब बरे होणे

सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते.

ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात.

सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याशिवाय रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

स्मरणशक्ती वाढते

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर.

वाईट सवयी नष्ट होतात

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.

मन आनंदी होते

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापी आध्यात्मिक ज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

कार्यक्षमता वाढते

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असो वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त काम पूर्ण होते. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

झोपेचे तास कमी होतात

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

दर्जेदार नातेसंबंध

आध्यात्मिक विवेक ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय
दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.

विचारशक्ती वाढते

आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.

जीवनाचा उद्देश

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

ध्यान (Meditation) कसे करावे?

* शांत, निवांत खोली निवडावी.

* मंद प्रकाश योजना असल्यास उत्तम. भगभगीत प्रकाश नसावा. मंद वासाची उदबत्ती लावल्यास वातावरणनिर्मिती उत्तम होते. परंतु धुराची एलर्जी असल्यास वा अस्थमा त्रास असल्यास उदबत्ती टाळणे योग्य.

* सुखासन वा स्वस्तिकासना सारख्या सुखकारक आसनात बसावे. आरामखुर्चीत बसले तरी चालेल. १० ते १५ मिनिटे बसता येणे हीच आवश्यकता आहे. सुखासन वा स्वस्तिकासनात बसल्यास हात गुढघ्यावर सैल ठेवावेत.

पद्ममुद्रे प्रमाणे एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या ओंजळीत, अग्रबाहू मांडीवर स्थित (आधारासाठी), व अकृत्रिमपणे सरळ बसावे. हे शक्य नसेल तर आराम खुर्चीत बसले तरी चालेल. हात खुर्चीच्या हातावर सैलसर ठेवावेत. शरीराची थोडीफार हालचाल चालते पण मध्येच उठावयास लागल्यास मेडीटेशनचा भंग होतो म्हणून खबरदारी घ्यावी.

* शवासनात आपण पायाकडून डोक्यापर्यंत शरीर शिथिल करतो. इथे त्याविरुद्ध म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक असे शिथिल करीत जावे.

* सुखेनैव आसनस्थित झाल्यावर डोळे मिटून घेऊन वर सांगितल्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक अवयव आठवून क्रमाने शिथिल करीत जावे. कपाळ, कान, गाल, मान, पाठ ते नितंबापर्यंत, त्यानंतर गळ्यापासून ते पोटापर्यंत, नंतर हात व पाय असा क्रम ठेवावा. पोटाचा विचार करताना श्वासाचा विचार अवश्य करावा. ह्या सर्व प्रकाराला एक ते दीड वा जास्तीत ज्यास्त दोन मिनिटे पुरे होतात.

* आता आपण बीज मंत्र मनातल्या मनात म्हणावा, ज्या योगे मनातील विचार बाजूस सारता येतील. बीज मंत्र म्हणावयाचा नसेल तर साक्षीभवना (Witnessing the mind) अभ्यास करावा. या योगे मन शांत रहाते त्याचा अनुभव घ्यावा.

* साक्षीभावना सुद्धा कठीण वाटत असेल तर हिमालायाच्या शिखरासारख्या निर्मळ गोष्टीचा विचार करावा.

* आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शावासनस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे १५ मिनिटात चुळबुळ होतेच वा पायांना मुंग्या आल्या सारखे वाटते. अन्यथा वेळ समजण्यासाठी घड्याळाचा गजर लावण्यास हरकत नाही.

* सावकाश डोळे उघडावे. हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम मेडीटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडीटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे रहाणे श्रेयस्कर होय.

हे सुद्धा वाचा,

जाणून घ्या, पाच मुखी रुद्राक्ष धारण केल्याने कोणते फायदे होतात

घरासाठी मूलभूत वास्तु टिप्स

Menopause Meaning Marathi – रजोनिवृत्ती : लक्षणे, कारणे, उपचार (संपूर्ण माहिती)

Avatar

teamdeeplyquote

About Author

डिपली मराठी - मराठी मध्ये माहिती ! आमचे उद्दीष्ट मराठी ब्लॉगिंगमध्ये मोलाचे योगदान देणे हे आहे. या ब्लॉगवर आपल्याला थोर लोकांचे विचार, महापुरुषांची चरित्रे, आरोग्याशी संबंधित उत्तम माहिती, अभ्यासाशी संबंधित लेख अशी अनेक प्रकारची मनोरंजक माहिती मराठी मध्ये भेटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

हे सुद्धा वाचा

chia seeds meaning in marathi
माहितीपूर्ण

चिया बिया काय आहेत, त्याचे फायदे | Chia Seeds/Sabja Seeds in Marathi

chia seeds in Marathi - चिया बियाणे खूप फायदेशीर आहेत, या लेखा मध्ये तुम्हाला चिआ सीड्स चे 7 जबरदस्त फायदे
Unique house names in Marathi
मराठी ज्ञान माहितीपूर्ण

अनोखी मराठी घरांची नावे | Royal House Names in Marathi

येथे आम्ही अनेक घरांच्या नावाच्या कल्पना (House Names in Marathi) सूचीबद्ध केल्या आहेत

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !