अर्थकारण

ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? वैशिष्ट्ये, प्रकार, पात्रता (संपूर्ण माहिती) – Overdraft Meaning in Marathi

overdraft meaning in marathi

Table of Contents

आर्थिक संकटाच्या वेळी, आपण अनेकदा असे पर्याय शोधतो की जिथून आपल्याला सहज पैसे मिळू शकतील आणि कमी व्याज देखील द्यावे लागेल यातलाच एक लोकप्रिय पर्याय म्हणजे वैयक्तिक कर्ज. पर्सनल लोनमध्ये काही हमी द्यावी लागत नाही परंतु या प्रकारचे लोन खूप महाग असतात.

या लेखात आम्ही तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट बँकिंग सुविधेबद्दल (Overdraft Facility Meaning in Marathi) सांगणार आहोत जिथून तुम्ही पैशाची गरज सहज भागवू शकता तेही कमी व्याजदरात.

ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? – Bank Overdraft Meaning in Marathi

ओव्हरड्राफ्ट ही बँकांनी त्यांच्या ग्राहकांना प्रदान केलेली आर्थिक सुविधा आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधा सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही बँकांद्वारे प्रदान केली जाते. बहुतांश बँका चालू खाते, पगार खाते आणि मुदत ठेव (FD) वर ही सुविधा देतात.

काही बँका शेअर्स, बाँड्स आणि विमा पॉलिसींसारख्या मालमत्तेवर सुद्धा ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. या सुविधेअंतर्गत तुम्ही बँकेतून तुम्हाला गरज असेल तितके पैसे घेऊ शकता आणि नंतर हे पैसे परत तुमच्या सोयीनुसार परत करू शकता.

ओव्हरड्राफ्ट कसे कार्य करते? – How Do Overdrafts Works in Marathi

याद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे नसतानाही त्यातून पैसे काढू शकता. ग्राहक विहित मर्यादेपर्यंतच पैसे काढू शकतो. ग्राहकाचा बँकेशी असलेला संबंध लक्षात घेऊन बँक ओव्हरड्राफ्ट मर्यादा ठरवते व ओव्हरड्राफ्ट खात्यातून काढलेल्या पैशावरच बँक व्याज आकारते.

ज्या बँकेत व्यक्तीचे खाते आहे, त्याच बँकेतून त्या व्यक्तीला ओव्हरड्राफ्ट कर्जाची सुविधा मिळू शकते. जसे, ग्राहकाला क्रेडिट कार्डमध्ये मर्यादा मिळते आणि ग्राहक त्या मर्यादेतून पैसे खर्च करतो आणि क्रेडिट बिल आल्यावर खर्च केलेले पैसे भरतो. त्याच प्रकारे, ओव्हरड्राफ्टमध्ये, एखाद्या व्यक्तीला त्याच्या बचत खात्यावर ओव्हरड्राफ्ट कर्ज मिळते. एकूण मर्यादेपैकी एखादी व्यक्ती जी रक्कम खर्च करते, त्या रकमेवर त्याला व्याज भरावे लागते.

अनेकदा, ओव्हरड्राफ्ट कर्जाचे व्याज क्रेडिट कार्डच्या व्याजापेक्षा कमी असते, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ओव्हरड्राफ्ट हा अल्पकालीन चांगला पर्याय आहे.

ओव्हरड्राफ्टची वैशिष्ट्ये – Overdraft Features in Marathi

मर्यादा

ओव्हरड्राफ्ट खात्यासाठी मर्यादा हि बँक निश्चित करते जी प्रत्येक ग्राहकासाठी वेगळी असू शकते.

EMI द्वारे पेमेंट केले जात नाही

जेव्हाही तुमच्याकडे निधी उपलब्ध असेल तेव्हा तुम्ही तुमच्या ओव्हरड्राफ्ट चे पेमेंट करू शकता. जसे तुम्ही कर्जाची परतफेड करता त्या पद्धतीने तुम्हाला ओव्हरड्राफ्टची रक्कम परत करण्याची गरज नाही. तुम्हाला मासिक हप्ते म्हणजेच EMIs मध्ये पैसे द्यावे लागणार नाहीत तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा हवे तितके पैसे जमा करू शकता.

किमान मासिक पेमेंट

ओव्हरड्राफ्टमध्ये किमान मासिक पेमेंट हा प्रकार नसतो. परंतु जर तुम्ही तुमचे ओव्हरड्राफ्ट पेमेंट वेळेवर केले नाही तर मात्र त्यामुळे तुमचा  क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.

व्याज दर

एकूण ओव्हरड्राफ्ट मर्यादेवर नव्हे तर वापरलेल्या ओव्हरड्राफ्टच्या रकमेवर व्याज आकारले जाते. याच calculation रोजच्या रोज केले जाते आणि महिन्याच्या शेवटी, एकूण बिल आकारले जाते. जर तुम्ही ते दरमहा भरत असाल आणि एखादा महिना तुम्ही चुकलात, तर व्याजाची रक्कम महिन्याच्या शेवटी काढलेल्या मूळ रकमेमध्ये जोडली जाईल आणि त्यानंतर त्या रकमेवर व्याज जोडले जाईल.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला 10% p.a. दराने 1 लाख रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळाली असेल आणि तुम्ही 10,000 रुपये काढले आणि 20 दिवसांनी पैसे खात्यात परत जमा केले तर बँक तुमच्याकडून 54.8 रुपये व्याज आकारेल {(10000 रुपये 10%) x 20/365} म्हणजे, फक्त 20 दिवसांसाठी.

शून्य प्री-पेमेंट शुल्क

जेव्हा तुम्ही एखादे कर्ज घेता तेव्हा त्यासाठी तुम्हाला प्री-पेमेंट शुल्क आकारले जाते. तथापि, ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या बाबतीत असे नाही.

तुम्ही ओव्हरड्राफ्टद्वारे कर्ज घेतलेल्या रकमेची परतफेड करता तेव्हा तुम्हला प्री-पेमेंट शुल्क द्यावे लागत नाही. तसेच, तुम्हाला ओव्हरड्राफ्ट रक्कम ईएमआय मध्ये सुद्धा भरण्याची गरज नसते, उधार घेतलेली रक्कम तुम्ही एकरकमी सुद्धा परत करू शकता.

संयुक्त खात्याची परवानगी

तुम्ही संयुक्त ओव्हरड्राफ्टचा लाभ घेतल्यास, तुम्ही आणि तुमचा सह-अर्जदार दोघेही कर्जाच्या परतफेडीसाठी जबाबदार असाल. दोघांपैकी कोणीही ओव्हरड्राफ्ट खात्यातून पैसे काढू शकतो.
म्हणजेच जर एक कर्जदार पैसे भरण्यास सक्षम नसेल तर दुसऱ्या कर्जदाराला संपूर्ण रक्कम भरावी लागेल. अशा परिस्थितीत, पेमेंट डिफॉल्ट झाल्यास, दोन्ही पक्षांनी बँकेला दिलेली हमी धोक्यात येते.

ओव्हरड्राफ्टचे प्रकार – Types of Overdraft in Marathi

पगारावर ओव्हरड्राफ्ट

नोकरदार वर्ग त्यांच्या पगार खात्यावर ओव्हरड्राफ्ट घेऊ शकतो. पगाराच्या दोन ते तीन पट ओव्हरड्राफ्ट घेता येतो. ज्या बँकेत तुमचे पगार खाते आहे त्याच बँकेतून ओव्हरड्राफ्ट सुविधेचा त्वरित आणि सहज लाभ घेता येतो.

होम लोनवर ओव्हरड्राफ्ट

बँका होम लोन ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या 50 ते 60 टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट उपलब्ध होऊ शकतो. यासाठी, कर्जाची परतफेड करण्याची क्षमता आणि ग्राहकाच्या क्रेडिट इतिहासाचे देखील मूल्यमापन केले जाते.

विमा पॉलिसीवरील ओव्हरड्राफ्ट

तुमची विमा पॉलिसी बँकेकडे हमी म्हणून ठेवून तुम्ही ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकता. ओव्हरड्राफ्टची रक्कम विमा संरक्षणाच्या विमा रकमेच्या आधारावर ठरवली जाते.

मुदत ठेवीवर ओव्हरड्राफ्ट

एखादी व्यक्ती त्याच्या मुदत ठेवी (FD) वर देखील ओव्हरड्राफ्ट घेऊ शकते. FD च्या एकूण रकमेच्या 75 टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्टचा लाभ घेता येतो. यावर व्याजही कमी असते. सामान्यतः बँका या प्रकारच्या OD साठी एफडीवरील व्याजापेक्षा दोन टक्के जास्त व्याजदार आकारतात.

ओव्हरड्राफ्ट कर्ज पात्रता – Overdraft Loan Eligibility

ओव्हरड्राफ्ट कर्ज सुविधेसाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे-

वयाचे निकष: किमान २१ वर्षे आणि कमाल ६५ वर्षे.
बँक खाते: अर्जदाराचे संबंधित बँकेत बँक खाते असावे.
उत्पन्नाचे निकष: बँकेवर अवलंबून असते.
चांगला CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर असणे गरजेचं आहे.

ओव्हरड्राफ्ट कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे – Documents Required for Overdraft loan

पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज
ओळखीचा पुरावा: पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड यांपैकी कोणतेही एक
पत्ता पुरावा: युटिलिटी बिल (पाणी/वीज बिल), पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक
वयाचा पुरावा: पासपोर्ट, दहावीचे कोणतेही प्रमाणपत्र

ओव्हरड्राफ्ट सुविधेची निवड केव्हा करावी? When to Choose Overdraft Facility?

Overdraft Loan Meaning in Marathi  – ओव्हरड्राफ्ट सुविधा कर्ज अल्प मुदतीसाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही अशा व्यवसायात असाल जिथे तुम्हाला अनियमित उत्पन्नामुळे अनेकदा आर्थिक  संकटाचा सामना करावा लागतो, तर OD सुविधा तुम्हाला उपयुक्त ठरू शकते.

ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या मदतीने तुम्ही आर्थिक आणीबाणीचा सामना करू शकता तेही तुमच्या गुंतवणुकीला धक्का न लावता. OD खाते तुम्हाला आर्थिक आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकते.

ओव्हरड्राफ्ट संबंधित प्रश्न (FAQ)

प्रश्न. कोणती बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रदान करते?

उत्तर: भारतातील जवळपास प्रत्येक सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील बँक आपल्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रदान करते. तथापि, बँकांनी विहित केलेले किमान आणि कमाल कर्जाची रक्कम, व्याज दर आणि कालावधी भिन्न असू शकतो आणि ते अर्जदाराच्या प्रोफाइल, आर्थिक इतिहास आणि क्षमतेवर अवलंबून असतो..

प्रश्न. मी ओव्हरड्राफ्टमधून पैसे काढू शकतो का?

उत्तर: होय, ओव्हरड्राफ्ट ही एक क्रेडिट सुविधा आहे जी ग्राहकांना एकूण मर्यादेतील काही भागांमध्ये पैसे वापरण्याची परवानगी देते.

प्रश्न. मी माझा ओव्हरड्राफ्ट भरला नाही तर?

उत्तर: जर तुम्ही थकबाकी ओव्हरड्राफ्टची रक्कम भरण्यास सक्षम नसाल, तर बँकेला तुमच्या विद्यमान बचत किंवा चालू खात्यातून शिल्लक रक्कम काढण्याचा अधिकार आहे.

प्रश्न. ओव्हरड्राफ्ट कोण देऊ शकतो?

उत्तर: बहुतेक बँका/कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारे ओव्हरड्राफ्ट ऑफर करता आणि काही आघाडीच्या बँकांमध्ये SBI, HDFC बँक, axis बँक, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक इ.बँका समाविष्ट आहे.

प्रश्न. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ कोण घेऊ शकतो?

उत्तर: ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ ग्राहक सुरक्षित किंवा असुरक्षित आधारावर घेऊ शकतो. ओव्हरड्राफ्ट सुविसुविधेचा लाभ बँकांचे ग्राहक स्वयंरोजगार व्यावसायिक, उद्योग इत्यादी घेऊ शकतात. जर तो पगारदार ओव्हरड्राफ्ट असेल, तर तो व्यावसायिक कारणांसाठी वापरला जाऊ शकत नाही आणि फक्त पगारदार कर्मचारीच त्याचा लाभ घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा,

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी: रणनीती, टिप्स, धोके (संपूर्ण माहिती)

तरुण वयात तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी १२ स्मार्ट टिप्स

IPO म्हणजे काय: अर्थ, व्याख्या, प्रकार आणि गुंतवणूक मार्गदर्शक

बैंक अकाउंट ट्रांसफर एप्लीकेशन कसे लिहावे 

तुम्हाला श्रीमंत बनवणारे आर्थिक नियोजन कसे कराल?

Avatar

teamdeeplyquote

About Author

डिपली मराठी - मराठी मध्ये माहिती ! आमचे उद्दीष्ट मराठी ब्लॉगिंगमध्ये मोलाचे योगदान देणे हे आहे. या ब्लॉगवर आपल्याला थोर लोकांचे विचार, महापुरुषांची चरित्रे, आरोग्याशी संबंधित उत्तम माहिती, अभ्यासाशी संबंधित लेख अशी अनेक प्रकारची मनोरंजक माहिती मराठी मध्ये भेटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

हे सुद्धा वाचा

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी
अर्थकारण

शेयर मार्केट टिप्स मराठी | Share Market Tips in Marathi

या शेअर मार्केट टिप्स आपल्याला शेअर मार्केटमध्ये आपला प्रवास सुरू करण्यास आणि शेअर मार्केट गुंतवणूकीची मूलभूत तत्त्वे शिकवण्यास मदत करतील.

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !