माहितीपूर्ण

पेटुनिया फूल – जाणून घ्या पेटुनीया ची लागवड, वाढ आणि काळजी कशी घ्यावी

Petunia flower information in Marathi

Petunia flower information in Marathi – पेटुनिया हे सर्वात लोकप्रिय फुलांपैकी एक फुल आहे. या फुलाच्या सुमारे ४ प्रजाती आहे ज्या मुख्यत्वे दक्षिण अमेरिके मध्ये आढळतात.

आता हे फूल प्रत्येक रंगात आढळते पण त्याचा खरा रंग निळा आहे. हे फूल गुलाबी, जांभळा, पिवळा इ. रंगा मध्ये सुद्धा आढळते. हे तुतारीच्या आकाराचे फूल आहे जे उन्हाळ्याच्या हंगामात फुलते.

या फुलाची काळजी घेणे खूप साधे आणि सोपे आहे. त्याची झाडे कशी लावायचे हे शिकल्यानंतर तुम्ही ते कंटेनर किंवा बागेत लावू शकता. असे म्हटले जाते की ही पेटुनिया फक्त तिथेच वाढते जिथे आजूबाजूचं वातावरण चांगला असता.

पेटुनिया फुलाचा आकार त्याच्या विविधतेवर अवलंबून आहे. त्याची झाडे सुमारे ६ इंच ते ४ फूट उंचीपर्यंत वाढू शकतात.

सहसा ही फुले फक्त १ इंच रुंद असतात, परंतु ती रंगात चमकदार असतात आणि मुबलक प्रमाणात वाढतात. या फुलाची पाने हिरव्या रंगाची असतात जी केसांनी झाकलेली असतात. याची पाने हृदयाच्या आकाराची किंवा अंडाकृतीदेखील असू शकतात. मुळात याची सर्व फुले सुगंधी असतात.

पेटुनिया फुलाच्या प्रजाती

पेटुनिया फूल चार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले आहे: –

ग्रँडिफ्लोरा – ग्रँडिफ्लोरामध्ये मोठी फुले असतात आणि हि फुले कंटेनर किंवा लटकलेल्या बास्केटमध्ये मोठी होतात.
मल्टीफ्लोरा – मल्टीफ्लोरामध्ये लहान फुले असतात परंतु ही फुले लहान असली तरी बाकी फुलांपेक्षा अधिक प्रमाणात फुलतात.
मिलिफ्लोरा – माइलफ्लोरा ही कॉम्पॅक्ट आणि छोट्या फुलांचा प्रकार आहे.
स्प्रेडिंग पेटुनिया – हि फुले ६ इंच लांब असतात आणि वेगाने वाढतात. हि फुले इतकी वेगाने वाढतात के कधी कधी संपूर्ण जमीन झाकून टाकतात.  

हवामान

पेटुनिया तुलनेने कठोर परिस्थिती आणि उष्ण हवामानात वाढतात. या फुला च्या वनस्पतीला दररोज किमान पाच तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
पण उन्हाळ्याच्या मध्यावर अर्धवट सावली त्यांना ताजे तवाने ठेवण्यास मदत करतात.

या फुलांचा जास्तीत जास्त विकास वसंत ऋतूच्या उत्तरार्धात होतो. या फुलांचे बहुतेक सर्व प्रकार संपूर्ण उन्हाळ्यात चांगले फुलतात. 

हे सुद्धा वाचा –

जवस खाण्याचे गुणकारी फायदे

वेलची खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे 

पेटुनिया वनस्पती चे रोपण कसे करावे?

जर आपण खाली दिलेल्या टीप्स चे अनुसरण केले तर या फुलांच्या वनस्पतीची रोपण करणे खूप सोपे आहे.

 1. प्रथम माती भांड्यात भरा.
 2. आता जमिनीवर हलक्या हाताने बियाणे शिंपडा आणि थोड्या मातीचा थर लावा, जास्त मातीचा थर होणार नाही याची काळजी घ्या, कारण याच्या बिया अंकुरण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते.
 3. आता हलक्या हाताने मातीच्या मिश्रणावर हलकेच दाबा. नंतर कोमट पाण्याने फवारणी करा
 4. आता कंटेनरला घुमट किंवा स्वच्छ प्लास्टिक पिशवीने झाकून ठेवा आणि नंतर कंटेनर सुमारे २१ ते २६ डिग्री Celsius च्या तापमानात ठेवा.
 5. सुमारे १० दिवसांत बीज उगवण्यास सुरुवात होईल. जेव्हा तुम्हाला अंकुर दिसायला लागेल तेव्हा ते वाढण्यासाठी घुमट किंवा पिशवी काढून झाडाला अधिक प्रकाश भेटेल अशा जागी ठेवा.

हे सगळे केल्यानंतर काहीच दिवसात पेटुनिया च्या झाडांना फुल यायला सुरुवात होईल. 

पेटुनिया झाडांची देखभाल कशी घ्यावी?

 • हि फुले कमी आर्द्रता आणि ओलसर जमिनीत चांगली वाढतात. याना बियाण्यांपासून फुलवले जाते.
 • बहुतेक भागात आठवड्यातून एकदा या झाडांना पाणी देणे पुरेसे आहे. परंतु जर हि फुले लटकत्या टोपल्या किंवा कंटेनर मध्ये लावली असतील तर त्यांना सतत पाणी देण्याची गरज आहे.
 • या फुलांच्या बहुतेक प्रकारच्या प्रजातींना मासिक किंवा साप्ताहिक खत देणे आवश्यक आहे जेणेकरून हि झाडे लवकर वाढण्यास मदत होईल.
 • काही जातींना फुलांच्या कळ्या उमलण्या साठी त्यांना सतत डेडहेडिंग किंवा स्टेम छाटणीची आवश्यकता असते..

पेटुनिया फुलाबद्दल काही खास माहिती

  • पेटुनिया फूल ही रात्री वाढणाऱ्या फुलांच्या प्रकारात मोडणाऱ्या फुलांचा प्रकार आहे. यात प्रामुख्याने 4 प्रजाती आहे ज्या प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळतात.
  • १९ व्या शतकात पेटुनियाला युरोपमध्ये आणण्यात आले जिथे या झाडांना सजावटी ची झाडे म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली. ज्या ठिकाणी माती सुपीक असते आणि सूर्यप्रकाश ४ ते ६ तास पोहोचतो अशा ठिकाणी पेटुनिया उगवला जातो.
  • हि फुले थंडी सहन करू शकत नाही थंडी च्या काळात याना घरात ठेवणं कधीही चांगला.
  • पेटुनिया ची झाडे सुमारे ५ इंच ते ४.५ फूट पर्यंत वाढू शकतात. याची पाने हिरव्या रंगाची असतात जी त्या फुलाच्या केसांनी झाकलेली असतात. पाने अंडाकृती किंवा हृदयाच्या आकाराची असू शकतात.
  • पेटुनिया फुले तुतारीच्या आकारात वाढतात आणि सर्व रंगांमध्ये उपलब्ध असतात. पांढरा, पिवळा, लाल, गुलाबी किंवा जांभळा. हि फुले बहुरंगी, वेगळ्या आणि पट्टेदार स्वरूपात फुलतात.
  • या फुलांचा जीवनक्रम एक वर्षाचा असतो. मुख्यत्त्वे हि फुले मे ते ऑक्टोबर च्या महिन्या मध्ये फुलतात. 

 

हे सुद्धा वाचा –

गिरिपुष्पाची माहिती : शेती, औषध आणि इतर उपयोग

श्रावणात कुट्टुचं महत्त्व मोठं, हे कुट्टु काय असतं? उपवासाला ते खाणं तब्येतीसाठी पोषक , ते कसं?

अशोकरिष्ट टॉनिक उपयोग, मात्रा आणि नुकसान

जवस/अळशी खाण्याचे फायदे 

बार्ली चे फायदे, उपयोग, नुकसान (संपूर्ण माहिती)

 

Avatar

admin

About Author

आमचे उद्दीष्ट मराठी ब्लॉगिंगमध्ये आपले मोलाचे योगदान देणे हे आहे. या ब्लॉगवर आपल्याला मराठी मध्ये माहिती ,थोर लोकांचे विचार, व्यक्तिमत्व विकास, महापुरुषांची चरित्रे, आरोग्याशी संबंधित उत्तम माहिती, आपली विचारसरणी बदलणारी प्रेरणादायक कथा, अभ्यासाशी संबंधित लेख आणि अशी अनेक प्रकारची मनोरंजक माहिती भेटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

हे सुद्धा वाचा

chia seeds meaning in marathi
माहितीपूर्ण

चिया बिया काय आहेत, त्याचे फायदे | Chia Seeds/Sabja Seeds in Marathi

chia seeds in Marathi - चिया बियाणे खूप फायदेशीर आहेत, या लेखा मध्ये तुम्हाला चिआ सीड्स चे 7 जबरदस्त फायदे
Unique house names in Marathi
मराठी ज्ञान माहितीपूर्ण

अनोखी मराठी घरांची नावे | Royal House Names in Marathi

येथे आम्ही अनेक घरांच्या नावाच्या कल्पना (House Names in Marathi) सूचीबद्ध केल्या आहेत

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !