Table of Contents
आपला हिंदु धर्म खूप अलौकिक व प्रत्येकाच्या जीवनात उत्साह आणि चैतन्य निर्माण करणारा आहे.
आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात काही ना काही सणवार असतात जे आपल्या आयुष्यात नवीन चैतन्य निर्माण करतात.
त्यातलाच एक सण येतोय तो म्हणजे वटपौर्णिमा. जेष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असते. यावर्षी 2022 मध्ये 14 जुन, 2022 रोजी मंगळवारी वटपौर्णिमा आहे.
आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुषी आणि निरोगी जीवनासाठी वट सावित्री व्रत केले जाते.
हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे, या दिवशी स्त्रिया आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात.
या दिवशी उपासना साहित्याला सुद्धा खूप महत्त्व असते कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.
त्यामुळे वट पौर्णिमेचा उपवास करण्यापूर्वी या पूजेच्या वस्तू घरी आधी विकत घेणे चांगले, जेणेकरून तुम्ही योग्य वेळी घाईघाईने काहीही विसरू नये.
यावर्षी तुमची गैरसोय होऊ नये व ऐन वेळेला तुमची धावपळ होऊ नये म्हणून मी खाली तुम्हाला संपूर्ण वट पौर्णिमा साहित्या ची लिस्ट दिली आहे.
हि लिस्ट तुमच्या मैत्रिणीं सोबत हि नक्की share करा जेणेकरून त्यांची हि गैरसोय होणार नाही.
Vat Purnima Puja Samagri List in Marathi
वट पौर्णिमे च्या पूजे साठी लागणार साहित्या ची लिस्ट खालील प्रमाणे :-
- ताट
- तांब्या व पाणी
- २ विड्याची पान
- १ सुपारी
- १ रुपयांचा चा कॉइन
- कापसाचे वस्त्र
- हळद कुंकू ची कोयरी
- साखर
- धागा
- दिवा,कापूर,अगरबत्ती
- फुल
- सौभाग्याचं लेणे
Vat Savitri Puja Samagri List (ओटी घालण्यासाठी लागणार साहित्य):-
१. गहू
२.पाच प्रकारची फळ – या मौसमात आंबे खूप असतात तर तुम्ही ५ आंबे वापरू शकता
३.दूध आणि पाणी
४.सौभाग्याचं लेन
५.विड्याची पान
६.खारीक,खोबर, हळकुंड, सुपारी, बदाम
७. सूतगुंडी – ७ फेरे घेण्यासाठी
तुम्ही वर दिलेलं संपूर्ण साहित्य घरबसल्या amazon वरून तुमच्या घरपोच सुद्धा मागवू शकता.
वट पौर्णिमा व्रत 2022 मुहूर्त
ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेची सुरुवात: 13 जून, सोमवार, 09.02.
ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथी: 14 जून, मंगळवार, संध्याकाळी 05.21 वा.
वट पौर्णिमा व्रत 2022: 14 जून, मंगळवारी साजरा केला जाईल
साध्य योग : सकाळपासून 09:40 वाजेपर्यंत हा शुभ योग आहे
वट पौर्णिमा व्रताचा मुहूर्त : भल्या पहाटेपासूनच प्राप्य व शुभ योग मागणीच्या कामांसाठी चांगले आहेत.
वटपौर्णिमा पूजाविधी :-
१. प्रथम वडाच्या झाडाला पाणी घालून घायचे.
२.नंतर विड्याचे पान व सुपारी, कॉइन घेऊन पूजा करायची आहे.
३.नंतर वडा च्या झाडाला कच्या धाग्याने ५ किंवा ७ फेरे मारावे.
५.कापसाचं वस्त्र झाडाला बांधावे व आरती करावी.
६.मनोभावे प्रार्थना करून सर्व स्त्रियांना हळद कुंकू लावावे.
या दिवशी स्त्रिया वटवृक्ष, प्रदक्षिणा आणि कलाव बांधतात. या वर्षी शनी जयंती आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी वट सावित्री व्रत होत आहे.
वटसावित्रीच्या उपवासाच्या दिवशी वडाच्या झाडाखाली बसून पूजा ऐकत व्रतकथा इच्छा पूर्ण करते. या व्रतात महिला सावित्री-सत्यवानाची कथा ऐकतात. वडाच्या झाडाखालीच सावित्रीने पती सत्यवानला पतीच्या व्रताने पुनरुज्जीवित केले होते. दुसऱ्या कथेनुसार, मार्कंडेय ऋषींनी बाल मुकुंदला वटवृक्षाची पूजा केल्यापासून भगवान शिवाच्या आशीर्वादाने वटवृक्षाच्या पानात आपले बोट चोखताना पाहिले होते.
वडाच्या झाडाच्या उपासनेमुळे घरात शांती आणि आनंद निर्माण होतो.